मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याचे प्रयत्न जोमाने व्हायला हवेत .. प्रा.सौरभ पाटणकरइचलकरंजी ता.२४,मराठी भाषेला गाथा सप्तशतीच्या पूर्वीपासून प्राचीन पाऊलखुणा आहेत.प्राकृत भाषेची हजारो वर्षाची परंपरा असलेल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे.त्याबाबतचा विस्तृत अहवाल सर्व पुराव्यांसह सहा - सात वर्षांपूर्वी ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे समितीने सादरही केला आहे. त्याबाबत राजकीय इच्छाशक्ती सकारात्मकतेने  वापरून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याचे प्रयत्न जोमाने व्हायला हवेत असे मत प्रा.सौरभ पाटणकर यांनी व्यक्त केले. ते मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानात "मराठी भाषा आणि साहित्य " या विषयावर बोलत होते. अन्वर पटेल यांनी प्रास्ताविक केले.शशांक बावचकर यांनी ग्रंथभेट देऊन वक्त्यांचे स्वागत केले.प्रारंभी ज्येष्ठ शिक्षक तात्यासाहेब कुडचे व इचलकरंजीच्या पहिल्या लोकनियुक्त नगरसेविका कलावतीताई मुठाणे यांना आदरांजली वाहण्यात आली.

प्रा.सौरभ पाटणकर यांनी भाषेची उत्पत्ती,मानवी उत्क्रांतीतील  भाषेचे  महत्व,समाज आणि भाषा ,मराठी भाषेचा उद्गम व विकास , मराठीतील शिलालेख व प्राचीन - अर्वाचीन ग्रंथ,भाषा व्यवहार, भाषा आणि संस्कृती, संत परंपरा , महानगरीय  साहित्य,समकालीन भाषा व साहित्य , भाषेच्या अस्तित्वाचे प्रश्न अशा अनेक मुद्यांच्या आधारे विषयाची सविस्तर मांडणी केली. यावेळी प्रसाद कुलकर्णी, प्रा.रमेश लवटे,अशोक केसरकर,पांडुरंग  पिसे, तुकाराम अपराध,सचिन पाटोळे,बापूसाहेब भोसले, महालिंग कोळेकर,नारायण लोटके, शंकरराव भांबिष्ट्ये, देवदत्त कुंभार, पाटलोबा पाटील, रियाज जमादार,वसंतराव कोळेकर आदी उपस्थित होते.सचिन पाटोळे यांनी आभार मानले.

फोटो : 'मराठी भाषा आणि साहित्य ' या विषयावर बोलतांना  प्रा.सौरभ पाटणकर मंचावर अन्वर पटेल

Post a comment

0 Comments