तारदाळ येथील जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुरस्कार प्रदान...

       हातकणंगले :. (प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले) 

     हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांना  जिल्हा परिषद, कोल्हापूर मार्फत  दिला जाणारा राजर्षि छत्रपती शाहू पुरस्कार राष्ट्रवादी खासदार शरद पवार , ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ , जलसंपदा मंत्री जयंत पाटील , खासदार धैर्यशिल माने यांच्या प्रमुख उपस्तीतीत प्रदान करणेत आला .

      राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा आदर्श समोर ठेवून ग्रामीण भागाच्या सर्वांगिण विकासासाठी व गोरगरिब यांच्या उन्नतीसाठी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे हे जिल्हा परिषद मार्फत विविध योजना राबवित असतात . त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या मतदार संघातील विकास कामाबरोबरच ग्राम पातळीवरुन ते जिल्हा पातळीपर्यंत सहकार, शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केली आहे . यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुरस्कार मिळाले बद्दल  पंचायत समिती सभापति , पंचायत समिती सदस्या,विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक  कार्यकर्ते तसेच संस्कार पत्रकार संघ तारदाळ - खोतवाडी चे पत्रकार, हितचिंतक यांनी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांचा सत्कार  करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.

Post a comment

0 Comments