तारदाळ मधील अंगणवाडी येथे बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत विविध कार्यक्रम संपन्न.हातकणंगले :  ( प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले)               

हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील अंगणवाडी क्रमांक 115,119,215  यांच्या संयुक्त विद्यमाने  बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रम अंतर्गत वृक्षारोपण , मुलीच्या जन्माचे स्वागत व रांगोळी स्पर्धा असे विविध कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्तीत  पार पडले . 

     सदर कार्यक्रमाची सुरवात स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली . यावेळी अंगणवाडीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले . तसेच नविन जन्माला आलेल्या मुलीचे गुलाब पुष्प देवून स्वागतही करण्यात आले . तसेच अंगणवाडी मधील मुलांच्या रांगोळी स्पर्धाही घेण्यात आले . यावेळी बेटी बचाओ बेटी पढाओ , स्त्रीभ्रूण हत्या , सावित्रीबाई फुले यांचा संदेश देणारी सुबक रांगोळीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारी आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती .यावेळी उपसरपंच सुरेखा कांबळे ,ग्रामपंचायत सदस्य सुधाकर कदम , माजी उपसरपंच सौ.वैशाली साळुंखे, अंगणवाडी शिक्षिका सौ.शोभा पाटिल , मनिषा शिंगे , अंजना जाधव , अंजना सुर्यवंशी , मंगल कांबळे  यांच्यासह माता पालक उपस्तीत होते .

Post a comment

0 Comments