कोकण महामार्ग कामाचा पाठपुरावा

कोकण महामार्ग कामाचा पाठपुरावा करण्यासाठी कोकणवासीयांचे अभियान.


PRESS MEDIA LIVE : पुणे : 

  कोकण महामार्ग कामाचा पाठपुरावा करण्यासाठी कोकणवासीयांचे अभियान सुरु करण्याचे कोकण भूमी प्रतिष्ठान ने ठरवले आहे . प्रतिष्ठान चे संस्थापक संजय यादवराव यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.    

कोकण हायवे समन्वय समितीची पहिली बैठक  संजय यादवराव यांच्या अध्यक्षतेखाली  दिनांक ३० डिसेंबर  रोजी रात्री ९ वाजता ऑनलाइन पद्धतीने झूम मीटिंग द्वारे पार पडली.

या बैठकीत कोकण हायवे समन्वय समिती चे प्रमुख  कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्रत्येक कार्यकर्त्याने हायवे संदर्भा च्या सद्यस्थितीबद्दल आपली मते मांडली. तसेच भविष्यात कोकण हायवे कसा विकसित करता येईल यावर देखील चर्चा झाली. सदर बैठकीमध्ये हायवेची तीन टप्प्यात विभागणी करून प्रत्येक विभागाचे कामकाज पाहण्यासाठी अभ्यासगट तयार करण्याचे ठरले.  पुढील दोन महिन्यात संपूर्ण हायवेचा सद्यस्थितीचा अहवाल बनवण्यात  येईल.  

संजय यादवराव म्हणाले,' हायवे प्रश्नावर अभ्यासपूर्ण पाठपुरावा करावा, याकरता अभ्यास गट तयार करावा लागेल तसेच हायवे प्रश्नावर आत्तापर्यंत कोकणात झाले नाही इतके मोठे अभियान  करावे, चांगल्या दर्जाचा कोकण हायवे पुढील दोन वर्षात कालबद्ध पद्धतीने निर्माण व्हावा याकरिता पक्षविरहित चळवळ उभारण्याचे काम कोकण हायवे समन्वय समिती करेल.  

यशवंत पंडित-इन्फ्रा कन्सल्टन्ट म्हणाले,' जे निवृत्त सरकारी अधिकारी आहेत त्यांची मदत घेऊन पुढच्या कॉन्ट्रॅक्टरला सुचित करू शकतो. पुलांच्या कामांची निविदा कधी निघाली याची विचारपूस करणे गरजेचे आहे.जिथे काम खराब आहे त्या कामाचे फोटोग्राफ घेऊन ठेवणे'

सतिश लळीत –निवृत्त अधिकारी म्हणाले,'हायवे वरील एक्झीट चुकीच्या ठिकाणी आहेत तसेच हे एक्झीट मोठे असले पाहिजेत. रस्त्यालगतचे साईन बोर्ड देखील चुकीचे आहेत यासाठी सर्वसमावेशक आंदोलन झाले पाहिजे. आरटीआय ची मुदत तीस दिवस असते तसेच तत्काळ साठी वेगळा आरटीआय असतो.

श्रीनिवास दळवी-निवृत्त सार्वजनिक बांधकाम अधिकारी म्हणाले,'आरवली पट्ट्या दरम्यान काहीच विकास झालेला नाही,  तसेच रस्त्याचे काम हळू चालत असताना व काम बंद असताना कॉन्ट्रॅक्टर का बदलला नाही याबद्दल विचारणा करावी लागेल तसेच अपडेटेड माहिती कुठून मिळेल याची चौकशी करावी'

  अभिजीत पेडणेकर म्हणाले,' कोकण हायवेवर असलेल्या 22 पुलांचे बांधकाम एकाच कॉन्ट्रॅक्टरला दिले गेले त्यामुळे पुलांचे काम खुपच निकृष्ट दर्जाचे आहे. हायवेलगत वृक्षारोपण करण्याची कामे येथील स्थानिकांना द्यावी त्यातून रोजगार निर्माण होईल.

उत्तम दळवी म्हणाले ,'कोकण हायवे संदर्भातील कामांवर लक्ष देण्यासाठी अभ्यास गट व दबाव गट असे दोन गट तयार करणे आवश्यक आहे. संबंधित अभ्यास गट सर्व कामाचा अहवाल तयार करेल व त्या अहवालाप्रमाणे दबावगट त्याचा पाठपुरावा करेल. तसेच प्रसारमाध्यमांचा देखील समावेश करून घेणे आवश्यक आहे.                             

Post a comment

0 Comments