भारतीय लष्कराची मोठी कारवाईत लाहोरच्या ठिकाणी भारतीय सशस्त्र दलांनी पाकचे हवाई संरक्षण रडार प्रणाली केले नष्ट .
प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे :
पुणे द : ऑपरेशन सिंदूर नंतर भारताला पुन्हा एक मोठे यश मिळाले आहे. भारतीय लष्कराने मोठी कारवाई करत लाहोरची रडार सिस्टीम उडवलीभारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर सुरु असल्याचे पाकिस्तानला दाखवत त्यांची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केली. भारताने त्यांच्या हवाई क्षेत्रात २५ ड्रोन पाठवत पुन्हा हल्ला चढवला. गुजरनवाल, रावळपिंडी, कराची, लाहोर येथे झालेल्या स्फोटात चारजण जखमी झाले आहेत तर एकाचा मृत्यू झाला आहे. ड्रोन हल्ल्यांमध्ये लाहोर, गुजरावाल, रावळपिंडी, बहावलपूरस मियावाली, कराची, चोर आणि अटॉक या शहरांचा समावेश आहे. पाकिस्तान मध्ये आता पर्यंत १२ स्फोट झाले आहे भारतीय जवानांनी पाकचे चांगलीच पुंगी वाजविले आहे तसेच या लष्करी हल्ल्यात कंधार आयसी-८१४ एअर इंडियाच्या विमान अपहरण प्रकरणाचा सूत्रधार रौफ अझहर एका हल्ल्यात मारला गेल्याची माहिती समोर आली आहे.
भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानातील बहवालपूरमधील दहशतवादी मसूद अझहरच्या जैश-ए- मोहम्मदचं मुख्यालय मरकज सुबहान अल्लाहवर हल्ला करत मसूद अझहरचं कंबरडं मोडलं. यात मसूद बचावला असला तरी त्याच्या कुटुंबातल्या १४ जणांचा खात्मा झाला. आता त्याच्या भावाचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. ६-७ मे च्या मध्यरात्री भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर मधील ९ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. या ठिकाणी लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात मोठ्या संख्येने दहशतवादी मारले गेल्याचे सांगण्यात आलं आहे.
रौफ अझहर कोण आहे..?
रौफ अझहर हा जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचा धाकटा भाऊ आहे. तो भारतीय सुरक्षा एजन्सींना सर्वात जास्त हवा असलेला दहशतवादी आहे.१९९९ मध्ये कंधार येथे झालेल्या इंडियन एअरलाइन्सच्या विमान आयसी-८१४ च्या अपहरणात तो मुख्य सूत्रधार होता. २४ डिसेंबर १९९९ रोजी काठमांडूहून दिल्लीला जाणारे आयसी-८१४ हे पाच दहशतवाद्यांनी अपहरण केले आणि पाकिस्तान, अमृतसर, दुबई मार्गे अफगाणिस्तानातील कंधार येथील तालिबान-नियंत्रित प्रदेशात नेले. जैश-ए-मोहम्मदचे नेते मसूद अझहर, अहमद उमर सईद शेख आणि मुश्ताक अहमद जरगर यांची सुटका करणे हा या अपहरणाचा उद्देश होता. या ऑपरेशनची योजना रौफ अझहरने आखली होती आणि तो या कटात सक्रियपणे सहभागी होता.
दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभाग
२००१ मध्ये जम्मू आणि काश्मीर विधानसभा आणि भारतीय संसदेवर आत्मघातकी हल्ल्यांच्या कटात रौफ असगरचा सहभाग होता. २०१६ मध्ये पठाणकोट हवाई दलाच्या तळावरील हल्ल्यातही त्यांचा सहभाग होता. २०१९ मध्ये पुलवामा हल्ल्याच्या कटात त्याने सक्रिय भूमिका बजावली होती. १९७५ च्या अपहरणाच्या नियोजनात अंमलबजावणीत आणि तालिबानशी समन्वय साधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय, २०१४ ते २०१९ पर्यंत झालेल्या इतर अनेक हल्ल्यांमध्ये रौफ अझहरच्या नावाचा समावेश आहे भारतीय लष्कराच्या वतीने ऑपरेशन सिंदुर हे अद्याप चालू आहे तर पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पूंछ, मेंढर आणि राजौरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर अंधादुंध गोळीबारासह तोफांचाही मारा केला होता. त्यात १६ नागरिकांनी जीव गमावला. यात ३ महिला आणि ५ मुलांचा समावेश आहे. त्याला भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. अशी माहिती माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.