मुंबईतून बॉलिवूड कोणीही


मुंबईतून बॉलिवूड कोणीही अन्यत्र हलवू शकत नाही - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले.

PRESS MEDIA LIVE : मुंबई :

मुंबई दि. 2 - मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे.उद्योगनगरी आहे.अनेक उद्योगांप्रमाणे चित्रपटसृष्टीच्या उद्योगाला अनुकूल आहे.त्यामुळे मुंबईतून सिने उद्योग अन्यत्र कोणी हलवू शकत नाही. उत्तर प्रदेशात बॉलिवूड सारखा चित्रपट उद्योग उभा करण्याचा प्रयत्न चांगला आहे. पण मुंबईच्या बॉलिवूडने जगात आपला ठसा उमटवला आहे.त्यामुळे मुंबईतून बॉलिवूड अन्यत्र कोणीही हलवू शकणार नाही. असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले. 

सह्याद्री अतिथीगृह येथे इलेक्ट्रिक रिक्षा चे उदघाटन केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ना रामदास आठवले बोलत होते.यावेळी रिपाइं चे राज्य सरचिटणीस अविनाश महातेकर ; आदी अनेक  मान्यवर उपस्थित होते. 

आजच्या स्पर्धात्मक युगात बेरोजगारांना रोजगार म्हणून  इलेक्ट्रिक रिक्षा एक चांगला पर्याय म्हणून पुढे आला आहे. इलेक्ट्रिक रिक्षा हे प्रदूषणविरहित वाहन आहे. बेरोजगारांना रोजगार म्हणून इलेक्ट्रिक रिक्षा ; मालवाहतूक करणारी इलेक्ट्रिक रिक्षा या वाहनांचा लाभ घ्यावा असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी यावेळी केले. 



                हेमंत रणपिसे 

                 प्रसिद्धिप्रमुख

Post a Comment

Previous Post Next Post