AdSense code पुणेः 31 डिसेंबरचे

पुणेः 31 डिसेंबरचे

 

सार्वजनिक ठिकाणी 31 डिसेंबर चे कार्यक्रम टाळावीत

 महापौर मुरलीधर मोहोळ .


PRESS MEDIA LIVE :  पुणे : मोहम्मद जावेद मौला :

पुणे - शहरात करोनाचा धोका अजूनही कायम आहे. त्यातच नाइट क्‍लब, पब आणि हॉटेल्सकडून सुरक्षित अंतराचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. त्यामुळे 'वर्षाअखेर आणि नववर्ष स्वागतदिनी होणाऱ्या संभाव्य गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी 31 डिसेंबरचे कार्यक्रम टाळावीत,' असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.

शहरात सध्या करोनाची स्थिती नियंत्रणात असली, तरी नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे दुसरी लाट कोणत्याही क्षणी येऊ शकते, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी यापूर्वी अनेकदा दिला आहे.त्यानंतरही हॉटेलमध्ये लोक असावेत आणि रात्री 11 पर्यंत बंद करणे बंधनकारक असताना या नियमांचे उल्लंघन केले जात आहेत. याबाबत पालिकेकडे तक्रारी येत आहेत. तसेच दरवर्षी 31 डिसेंबरला शहरातील फर्गसन रोड, झेड ब्रिज, गुडलक चौक आणि कॅम्प परिसरात मोठ्या प्रमाणात तरुण पिढी गर्दी करते. त्या पार्श्‍वभूमीवर इतक्‍या मोठ्या प्रमाणात विनामास्क नागरिक एकत्र आल्याने करोनाचा संसर्ग वाढू शकतो. या पार्श्‍वभूमीवर महापौरांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.

शहरात 163 नवीन करोना पॉझिटिव्ह
शहरात सोमवारी 163 जणांना करोनाची लागण झाली, तर 252 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. गेल्या आठवडाभरातील ही सर्वांत कमी बाधितांची नोंद आहे. शहरातील आतापर्यंतच्या करोनाबाधितांची संख्या 1 लाख 76 हजार 228 झाली असून, त्यापैकी 1 लाख 66 हजार 549 जण करोनामुक्‍त झाले आहेत.

शहरात सध्या करोनाचे 5098 सक्रिय रुग्ण असून, 390 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. 226 जण व्हेंटिलेटरवर, तर 164 जण आयसीयूतील विना व्हेंटिलेटर खाटांवर उपचार घेत आहेत. 856 रुग्णांना ऑक्‍सिजन लावण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत शहरातील 4 आणि शहराबाहेरील 3 जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. आतापर्यंत शहरात 4581 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. महापालिकेचे विविध कोविड केअर सेंटर, खासगी रुग्णालये आणि प्रयोगशाळा आणि रॅपिड अँटिजेन टेस्टद्वारे दिवसभरात 1862 करोना चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत शहरात 8 लाख 86 हजार 806 करोना चाचण्या झाल्या आहेत.


Post a comment

0 Comments