कोल्हापूर महानगपालिकेच्या निवडणूक

 कोल्हापूर महानगपालिकेच्या निवडणूक रणधुमाळी सुरू. 

 प्रभाग आरक्षण सोडत जाहीर.


PRESS MEDIA LIVE :. कोल्हापूर :

कोल्हापूर :  इच्छुकांसह सर्वांनाच धाकधुक लागलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज अडीच तासांत तब्बल 81 प्रभागांची आरक्षण सोडत काढण्यात आली. अनेक प्रस्थापित नगरसेवकांच्या प्रभागाचे आरक्षण बदलले असले तरी त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनीही अन्य प्रभागांची चाचपणी सुरू केली असून, शहरात निवडणूक रणधुमाळीस सुरुवात झाली आहे. सर्वपक्षीय प्रतिनिधी व नागरिकांसमोर पूर्ण पारदर्शीपणे ड्रॉ पद्धतीने आरक्षण सोडत काढण्यात आली. सोडतीच्या ठिकाणी इच्छुक उमेदवार त्यांचे समर्थक आणि कोल्हापूरकरांनी मोठी गर्दी केली होती.

गेल्या महिन्यात 15 नोव्हेंबर रोजी महापालिका सभागृहाची मुदत संपुष्टात आली.मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याने आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्यामार्फत प्रशासuकीय कारभार सुरू आहे. सध्या कोरोनाचा जोर कमी आल्याने महापालिका निवडणूक 2020 अंतर्गत राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सनस, अव्वर सचिव अतुल जाधव, कक्ष अधिकारी प्रदीप परब, महापालिका आयुक्त तथा प्रशासक कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्या उपस्थितीत संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृहात आज सकाळी आरक्षण सोडतीची प्रक्रिया पूर्ण झाली. लॉटरी पद्धतीने ही सोडत काढण्यात आली.


प्रथम अनुसूचित जाती प्रवर्गासाठीच्या एकूण 11 प्रभागांपैकी पाच प्रभाग पुरुषांसाठी, तर सहा प्रभाग महिलांसाठी आरक्षित करण्यात आले. त्यानंतर नागरिकांचा मागास (ओबीसी) प्रवर्गासाठी एकूण 22 प्रभागांचे आरक्षण निश्चित करून, त्यात अकरा पुरुष व अकरा प्रभाग महिलांसाठी आरक्षित करण्यात आले. त्यानंतर अखेरीस उर्वरित सर्वसाधारण प्रवर्गातील 48 प्रभागांत 24 पुरुष आणि 24 महिला प्रभागांचे आरक्षण काढण्यात आले.

23 डिसेंबर ते 4 जानेवारीपर्यंत हरकती व सूचना

प्रभाग आरक्षण सोडतीनंतर प्रारूप प्रभागरचनेची अधिसूचना 23 डिसेंबर 2020 रोजी राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 23 डिसेंबर ते 4 जानेवारी 2021 पर्यंत हरकती व सूचनांसाठी मुदत देण्यात आली आहे. ताराबाई पार्क येथील महापालिकेच्या निवडणूक कार्यालयात या सूचना व हरकती स्वीकारल्या जाणार असून, हरकती व सूचनांचे विवरणपत्र 6 जानेवारी 2021 रोजी राज्य निवडणूक आयोगाला सादर केले जाणार आहे.

प्रवर्गनिहाय आरक्षण, प्रभाग क्रमांक, कंसात नाव

अनुसूचित जाती प्रवर्ग

महिला - प्रभाग क्र. 30 (खोलखंडोबा), प्रभाग 6 (रामानंदनगर-जरगनगर), प्रभाग 75 (आपटेनगर-तुळजाभवानी), प्रभाग 40 (दौलतनगर), प्रभाग 16 (शिवाजी पार्क), प्रभाग 19 (मुक्तसैनिक वसाहत).

पुरुष - प्रभाग 7 (सर्किट हाउस), प्रभाग 8 (भोसलेवाडी- कदमवाडी), प्रभाग 20 (राजर्षी छत्रपती शाहू मार्केट यार्ड), प्रभाग 62 (बुद्ध गार्डन), प्रभाग 79 (सुर्वेनगर).

नागरिकांचा मागास (ओबीसी) प्रवर्ग

महिला - प्रभाग 13 (रमणमळा), प्रभाग 15 (कनाननगर), प्रभाग 21 (टेंबलाईवाडी), प्रभाग 24 (साईक्स एक्सटेन्शन), प्रभाग 36 (राजारामपुरी), प्रभाग 49 (रंकाळा स्टॅण्ड), प्रभाग 52 (बलराम कॉलनी), प्रभाग 53 (दुधाळी पॅव्हेलियन), प्रभाग 56 (संभाजीनगर बसस्थानक), प्रभाग 64 (शिवाजी विद्यापीठ), प्रभाग 71 (रंकाळा तलाव).

पुरुष - प्रभाग 18 (महाडिक वसाहत), प्रभाग 22 (विक्रमनगर),

प्रभाग 23 (रूईकर कॉलनी), प्रभाग 25 (शाहुपुरी तालीम), प्रभाग 26 (कॉमर्स कॉलेज), प्रभाग 38 (टाकाळा खण-माळी कॉलनी), प्रभाग 50 (पंचगंगा तालीम), प्रभाग 59 (नेहरूनगर), प्रभाग 72 ( फुलेवाडी), प्रभाग 73 (फुलेवाडी-रिंगरोड), प्रभाग 80 (कणेरकरनगर-क्रां. नाना पाटील नगर).

सर्वसाधारण प्रभाग (महिला)

प्रभाग 1 (शुगरमिल), प्रभाग 2 (कसबा-बावडा पूर्व बाजू), प्रभाग 3 (कसबा-बावडा, हनुमान तलाव), प्रभाग 5 (लक्ष्मी-विलास पॅलेस), प्रभाग 10 (शाहू कॉलेज), प्रभाग 11 (ताराबाई पार्क), प्रभाग 12 (नागाळा पार्क), प्रभाग 14 (व्हिनस कॉर्नर), प्रभाग 28 ( सिद्धार्थनगर), प्रभाग 32 (बिंदू चौक), प्रभाग 34 (शिवाजी उद्यमनगर), प्रभाग 39 (राजारामपुरी एक्स्टेन्शन), प्रभाग 41 (प्रतिभानगर), प्रभाग 43 (शास्त्र्ााrनगर- जवाहरनगर), प्रभाग 44 (मंगेशकरनगर), प्रभाग 45 (कैलासगडची स्वारी), प्रभाग 48 (तटाकडील तालीम), प्रभाग 55 (पद्माराजे उद्यान), प्रभाग 57 (नाथागोळे तालीम), प्रभाग 58 (संभाजीनगर), प्रभाग 60 (जवाहरनगर), प्रभाग 65 (राजेंद्रनगर), प्रभाग 69 (तपोवन), प्रभाग 81 (नाना पाटीलनगर, जिवबानाना पार्क).

सर्वसाधारण प्रभाग

प्रभाग 4 (लाईन बाजार), प्रभाग 6 (पोलीस लाईन), प्रभाग 9 (कदमवाडी), प्रभाग 17 (सदरबाजार), प्रभाग 27 (ट्रेझरी ऑफिस), प्रभाग 29 (शिपुगडे तालीम), प्रभाग 31 (बाजार गेट), प्रभाग 33 (महालक्ष्मी मंदिर), प्रभाग 35 (यादवनगर), प्रभाग 37 (राजारामपुरी-तवन्नाप्पा पाटणे हायस्कूल), प्रभाग 42 (पांजरपोळ), प्रभाग 46 (सिद्धाळा गार्डन), प्रभाग 47 (फिरंगाई), प्रभाग 51 (लक्ष्यतीर्थ वसाहत), प्रभाग 54 (चंद्रेश्वर), प्रभाग 61 (सुभाषनगर), प्रभाग 63 (सम्राटनगर), प्रभाग 66 (स्वातंत्र्यसैनिक कॉलनी), प्रभाग 68 (कळंबा फिल्टर हाऊस), प्रभाग 70 (राजलक्ष्मीनगर), प्रभाग 74 (सानेगुरुजी वसाहत), प्रभाग 76 (साळोखेनगर), प्रभाग 77 (शासकीय मध्यवर्ती कारागृह), प्रभाग 78 (रायगड कॉलनी).

Post a Comment

Previous Post Next Post