सिंधुदुर्गनगरी


 नावीन्य पूर्ण योजना यश्वीपणे राबविण्यास जिल्हा प्रशासन अपयशी, दी  बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या जिल्हाध्यक्षांचा आरोप

PRESS MEDIA LIVE :  सिंधुदुर्गनगरी ता. १९

प्रसाद पाताडे

जिल्ह्यात नाविन्यपूर्ण योजना सुरू झाल्यापासून या जिल्ह्यातील अनुसूचित जाती नवबौद्ध विशेष घटकांच्या वस्तीमध्ये एकही योजना राबवलेली नाही सर्वसाधारण घटकांसाठी राबविलेल्या योजनेत मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा शाखा सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांनी केला आहे.

यावेळी यादव यांनी सांगितल की, नाविन्यपूर्ण योजनेतून सर्वसाधारण घटकांसाठी राबविलेल्या योजना पैकी नेब्युलायझर हिमोग्लोबिन मीटर मशीन यासाठी हाफकिन संस्थेला एक कोटी रुपये देऊन दोन वर्षे उलटले तरी जिल्ह्यातील उपकरणे दाखल झालेली नाहीत त्यामुळे या योजनेत अपहार झाल्याचा आरोप यावेळी यादव यांनी केला आहे 

शासनाने जिल्ह्यात नाविण्यपूर्ण योजना यशस्वी पणे राबविली असती,  समाजमंदिर, देवळे, बौध्दविहारशाळा यांमध्ये नाविन्यपूर्ण योजनेतून इंटरनेट सुविधा उपलब्ध केली असती तर आज जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला असता, असे यादव यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा शाखा सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांनी ओरोस फाट्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याखाली सकाळी १० ते सायंकाळी ०६ या वेळेत बेमुदत घंटानाद आंदोलन छेडले आहे यावेळी दिलीप नाईक, देवदत्त पडते, रविकांत जाधव, अरुण नाईक, या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

Post a comment

0 Comments