पुण्यात लोकार्पण


अंक नाद ' द्वारे गणिताची गोडी आता इंग्रजी मधूनही उपलब्ध !                                                                                         अंक नाद ' चे इंग्रजी  ऍपचे पुण्यात  लोकार्पण 

PRESS MEDIA LIVE : पुणे ;



'अंक नाद '  ऍप द्वारे गणिताची गोडी आता इंग्रजी मधूनही उपलब्ध झाली आहे. मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा लि निर्मित 'अंक नाद ' ऍप च्या इंग्रजी आवृत्तीचे  लोकार्पण सोमवारी पुण्यात ऑन लाईन पद्धतीने झाले .

 भारतीय गणित आणि  लोप पावत असलेले मराठी पावकी -निमकी सारखे पाढे या भारतीय गोष्टींचे कालानुरूप   पुनरुज्जीवन करून सर्व देशात आणि परदेशात प्रसार करण्यासाठी हा उपक्रम कार्यरत आहे . 

'अंकनाद ' अॅपचे निर्माते मंदार नामजोशी यांनी उपक्रमांची माहिती दिली.'अंकनाद’ हे गणिताकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन देणारं  अॅप   आहे. रोजच्या जगण्यात गणिताला पर्याय नाही . गणित विषय रंजक करुन सांगण्याचे विविध उपक्रम ' अंकनाद ' तर्फे केले जातात,गणिताची आवड निर्माण केली जाते ,असे त्यांनी सांगितले. 'अंक नाद'चे संचालक पराग गाडगीळ यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर या उपक्रमात सहभागी आहेत . 

या  ऍप च्या मार्गदर्शक समितीमध्ये  ज्येष्ठ शास्त्रज्ञ  डॉ रघुनाथ माशेलकर ,डॉ अनिल सहस्त्रबुद्धे ,(अध्यक्ष ,अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद ),तालयोगी सुरेश तळवलकर ,संगीतकार अशोक पत्की , प्राजक्ती गोखले (बालभारती च्या अभ्यास मंडळाच्या सदस्य ),प्रसाद मणेरीकर (संस्थापक ,अनुभूती नॉलेज सेंटर ),प्राची साठे ,प्रा .अनघा ताम्हणकर ,साक्षी हिसवणकर,चारुदत्त आफळे ,शोभा नेने (अध्यक्ष ,बृहन्मुंबई गणित अध्यापक मंडळ ),मंदार नामजोशी ,निर्मिती नामजोशी ,समीर बापट  हे सन्माननीय सदस्य आहेत .

                    अंकनाद अॅपविषयी 

दोन ते तीसचे पाढे घोकून पाठ करणं हे विद्यार्थ्यांना करावं लागतंच. पण या नव्या पिढीला पावकी, निमकी, पाऊणकी हे शब्दच माहीत नाहीत.  ही कोष्टकं म्हणजेच अपूर्णांकांचे पाढे पाठ केले, तर गणिताचा पाया पक्का होऊन जातो. ‘अंकनाद’ मध्ये पाढ्यांबरोबरच ही कोष्टकंसुद्धा साध्या सोप्या पद्धतीने शिकवली जातात.

गणित या विषयाची मुलांना एका नव्या, आकर्षक रुपात ओळख करून द्यावी आणि अवघड वाटणाऱ्या या विषयाशी सहजसोप्या रीतीने मैत्री व्हावी या उद्देशाने 'अंकनाद' ऍपची निर्मिती झाली. अल्पावधीतच मुलं आणि त्यांचे पालक यांनी या ऍपला भरघोस प्रतिसाद दिला. 

  विविध उपक्रम आणि कार्यशाळा यांच्या मार्फत  विद्यार्थी, शिक्षक, पालकांसाठी सतत काही नवीन देता यावे हाच अंकनादचा प्रयत्न आहे. 

     

                                                                                                                                                                                                                           

Post a Comment

Previous Post Next Post