नायडू हॉस्पिटल स्तालंतर प्रस्ताव रद्द.



नायडू हॉस्पिटल स्थलांतर प्रस्ताव रद्द करणेबाबत पुणे जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी निदर्शने

PRESS MEDIA LIVE : पुणे :

नायडू हॉस्पिटल हे सर्वसामान्य ोपडपट्टी मध्यमवर्गीय गरजू गरीब लोकांसाठी वैद्यकीय सेवा पुरवणारे पुणे शहरातील जागतिक पातळीवर ओळखले जाणारे हॉस्पिटल आहे.

शिवाय नायडू हॉस्पिटलची आरोग्य सुविधा पुरविण्याची एकशे वीस वर्षांपेक्षा जास्त ऐतिहासिक गौरवशाली परंपरा आहे. ज्या हॉस्पिटलने प्लेग सारखे रोगाची महामारीत संशोधन करून पुणेकरांना वाचविले व पुण्याला चे ओळख जागतिक पातळीवर निर्माण केले. व सध्या कोरोना या हाणामारीत अतिशय चांगली कामगिरी बजावली अशा नायडू हॉस्पिटलला बाणेर याठिकाणी स्थलांतर करण्याचा डाव काही राज्यकर्त्यांनी सुरू केल्याच्या माहिती वृत्तपत्राच्या माध्यमातून पुढे येत आहे.

नायडू हॉस्पिटलची असलेली 28 एकर जागेवर वैद्यकीय महाविद्यालय जरूर बनवा मात्र पुणे शहराच्या मुख्य सिटी मध्ये असलेल्या 200 पेक्षा जास्त झोपडपट्टीधारकांना सहज हॉस्पिटल पर्यंत जाण्याची सुविधा असलेल्या नायडू हॉस्पिटल ला स्थलांतर करू नये.

व उद्या होणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या जनरल बॉडी ची मिटिंग मध्ये सर्व सभासदांनी याचा विरोध करावा याकरिता  आज नायडू हॉस्पिटल बचाव कृती समितीच्या वतीने मा.राजेश देशमुख जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.

या प्रसंगी मूलनिवासी मुस्लीम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार चारीटेबल ट्रस्ट अध्यक्ष सागाई राजेश नायर,साबीर शेख तोफखाना,सलीम शेख, साबिर सय्यद,जमीर मोमीन, अमजद शेख,अशोक माने,आयटी शेख, राजेश नायर,मौलाना शकील, समीर शेख  उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post