शिरोळ तालुक्यात विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही

 शिरोळ तालुक्यात विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही

सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर

आलाससह सात गावात विविध विकास कामांचा शुभारंभ



PRESSMEDIA LIVE : आलास-

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकार समोर प्रचंड मोठे आर्थिक संकट उभे आहे, असे असले तरी शिरोळ तालुक्यातील विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, शासनाच्या विविध योजनांमधून तालुक्याच्या गावा-गावा मधे अपेक्षित विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न राहतील अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.

या विभागाच्या जिल्हा परिषद सदस्य परविन पटेल पंचायत समिती सदस्य रूपाली मगदूम व मल्लाप्पा चौगुले यांनी मतदारसंघात केलेल्या कामाचे कौतुक राज्यमंत्री यड्रावकर यांनी यावेळी केले. सर्वांना सोबत घेऊन विकास कामे केली जातील असे सांगताना कोरनोचा संसर्ग कमी होत असला तरी जनतेने दुर्लक्ष न करता शासन निर्णयाचे पालन करावे असेही राज्यमंत्री डॉक्टर म्हणाले,

शिरोळ तालुक्यातील आलास, बुबनाळ, औरवाड, गौरवाड, शेडशाळ, कवठेगुलंद या गावांमध्ये सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आलास जिल्हा परिषद मतदारसंघाच्या जिल्हा परिषद सदस्य परवीन दादेपाशा पटेल यांच्या २०१९-२० आर्थिक वर्षाच्या विकास निधीमधून मंजूर झालेल्या कामाचा शुभारंभ करताना राज्यमंत्री यड्रावकर बोलत होते,

सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या विशेष प्रयत्नातून या सात गावांसाठी जवळपास अडीच कोटीचा निधी मंजूर झाला असून जिल्हा परिषद सदस्या परविन दादेपाशा पटेल यांच्या प्रयत्नातून आलास जिल्हापरिषद मतदारसंघासाठी जवळपास 1 कोटी 80 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे,या सर्व कामांचा शुभारंभ सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या शुभहस्ते आज गणेशवाडी वगळता उर्वरित सहा गावांमध्ये झाला, यावेळी आलास जिल्हा परिषद मतदार संघाच्या  जिल्हा परिषद सदस्या परविन पटेल, पंचायत समिती सदस्या व माजी सभापती रूपाली मगदूम माजी सभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्य मल्लाप्पा चौगुले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. अंतर्गत रस्ते, चौक सुशोभिकरण, गटर्स, पाणंंद रस्ते, ईदगाह सुशोभीकरण, दफनभूमी, हायमास्ट दिवे, दलित वस्ती सुधारणा, रस्ते काँक्रिटीकरण, यासह विविध विकास कामांचा आज शुभारंभ झाला, आलास येथे कृष्णा नदीपलीकडील सात गावांमधील जनतेच्या वतीने राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व जिल्हा परिषद सदस्य परविन पटेल यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी आलास येथे परविन पटेल, रूपाली मगदूम, दादेपाशा पटेल, महावीर मगदूम, दस्तगीर शेख, नईम मुजावर, इलियास, चांदपाशा पाटील, फजल पाटील, प्रकाश मगदूम, मखमल सर, मेजर मखमला, गौस मखमला, किसन गावडे, दिलीप कांबळे, प्रकाश बिडकर, जवाहर कांबळे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते,

बुबनाळ येथे अजित शहापुरे, धनपाल मरजे, जगन्नाथ जाधव, विद्यासागर मरजे, महावीर पोमाजे, मल्लाप्पा ऐनापुरे, बापू राजमाने, मुन्ना मकानदार व ग्रामस्थ उपस्थित होते.

गौरवाड येथे मल्लाप्पा चौगुले, आदिनाथ आरबाळे, जयपाल कुंभोजे, बशीर कोल्हापुरे, आनंदा कुम्मे,तय्यब नदाफ, वाशिम मुल्ला, सतीश बन्ने, जावेद पटेल, बाबालाल चिंचवाडकर, आप्पासो गडगले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते,

कवठेगुलंद येथे मल्लाप्पा चौगुले, बाबगोंडा पाटील, आनंदा कुम्मे, रमेश शिंदे, विनोद जगताप, कुमार जगताप, प्रमोद शेकदार ग्रामपंचायत प्रशासक जमादार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

शेडशाळ येथे साहेबजादा पाटील, दत्त चे संचालक निजामसो पाटील, भोला तकडे, शिरीष पोतदार, सदाशिव कदम, बाळासो हरोले, हाजीसो पाटील, अण्णासो नाईक, विजय कोळी, रावसाहेब महाडिक, रोहित कल्याणी, महावीर मोळे, भोला पाथरवट व ग्रामस्थ उपस्थित होते.

औरवाड येथे सईद पटेल, युनुस पटेल, रामचंद्र रावण, प्रताप आगरे, अफसर पटेल, मुस्ताक पटेल, फैजल पटेल, फिरोज पटेल, तमीर बहादुर व ग्रामस्थ उपस्थित होते,

Post a Comment

Previous Post Next Post