माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती.


 माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती जालना जिल्हा व शहर पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली


PRESS MEDIA :

जालना जिल्हा प्रतिनिधी


आज दि.10/10/2020 रोजी माहिती अधिकार व पत्रकार सुरक्षा समिती जालना जिल्हा व शहर पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. ही बैठक माहिती अधिकार व पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्य प्रभारी प्रवक्ते तथा सचिव महेशजी सारणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली यावेळी सर्वांनी एकमेकांच्या ओळखी करून दिल्या.महेश सारणीकर यांनी सर्वांना मार्गदर्शन करताना माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती, समितीचे कार्य, आजचे भेडसावणारे प्रश्न आणि भविष्यातील विषय आणि प्रकल्प यासंबंधीप्रत्येक पदाधिकाऱ्यास बोलण्याची संधी देण्यात आली आणि आपापले वेगळे काही वैशिष्ठ्य, अनुभव, आणि वेगवेगळे क्षेत्र यांची माहिती त्यांच्यामार्फत इतरांना सांगता आली. त्याबरोबरच संघटना, संघटनात्मक कार्य, संघटना बांधणी, जिल्हा, शहर कार्यकारिणी सह सर्व तालुक्यांची कार्यकारिणी बांधणी संबंधी चर्चा झाली.

विशेषत्वाने विठ्ठल वाघमारे यांची जाफ्राबाद तालुका अध्यक्षपदी नियुक्ती झाली त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

बैठकीचे प्रास्ताविक गौरव बुट्टे यांनी केले, तसेच सर्वांचे आभार प्रदर्शन भगवान धनगे यांनी केले.

सदरील बैठकीस महेश सारणीकर - महाराष्ट्र राज्य प्रभारी प्रवक्ता तथा राज्य सचिव, गौरव बुट्टे - जालना जिल्हा उपाध्यक्ष, बाळू नामदे - जालना जिल्हा कार्याध्यक्ष, गणेश बासकर - जालना जिल्हा संघटक - सागर जोशी - जालना जिल्हा संपर्क प्रमुख, तनवीर बागवान - जालना जिल्हा ग्रामीण सहसंघटक, भगवान धनगे - जालना तालुका संपर्क प्रमुख, विठ्ठल वाघमारे - जाफ्राबाद तालुका अध्यक्ष आणि रामभैय्या फुलमाळी हे हजर होते.

काही जण प्रवासात गाड्यांच्या अडचणी आल्यामुळे पोहोचू शकले नाहीत असे ऋषिकेश उस्मानपुरकर - जालना जिल्हा सचिव हे परतूरवरून येत होते तसेच सद्दाम मिर्झा - भोकरदन तालुका अध्यक्ष, जुनेदखान पठाण - भोकरदन तालुका उपाध्यक्ष, कृष्णा सपकाळ - भोकरदन तालुका सचिव, सोहेल शेख - भोकरदन तालुका सरचिटणीस, रावसाहेब सहाने - भोकरदन तालुका सहसचिव हे सर्व भोकरदन वरून येत होते


गौरव बुट्टे,

जालना जिल्हा उपाध्यक्ष,

माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती

महाराष्ट्र


महेश सारणीकर,

महाराष्ट्र राज्य प्रभारी प्रवक्ता तथा राज्य सचिव

माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती

महाराष्ट्र माहिती दिली.

Post a comment

0 Comments