लवकरच सकारात्मक निर्णय.


 कलापथकासह सर्व प्रकारच्या कलाकारांबाबत कार्यक्रम सुरु करण्यासाठी लवकरच सकारात्मक निर्णय

सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर

PRESS MEDIA LIVE :  कोल्हापूर-

कलापथक कलाकारांबरोबरच इतर सर्व प्रकारच्या कला सादर करणाऱ्या कलाकारांना त्यांचे कार्यक्रम सादर करण्यासाठी आवश्यक ती नियमावली तयार करून राज्य शासन लवकरच परवानगी देण्याबाबत सकारात्मक असल्याची ग्वाही सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली,कोल्हापूर येथे कलापथक कलाकार संघटनेच्या वतीने त्यांच्या मागण्या साठी आयोजित केलेल्या आमरण उपोषणाला राज्यमंत्री यड्रावकर यांनी भेट दिली यावेळी ते बोलत होते,कोरोना महामारीमुळे मागील सहा महिन्यापासून सारे जग थांबले आहे, उद्योग, व्यवसाय ,व्यापार, शिक्षण ही सर्व क्षेत्रे बंद आहेत, बेरोजगारी वाढली आहे, यातच कलापथकासह वेगवेगळ्या कला सादर करून उपजीविका करणाऱ्या हजारो कलाकारांच्या वर उपासमारीची वेळ आलेली आहे, कोरोना संसर्ग मधून थोड्या प्रमाणात का होईना राज्य सावरत आहे, लॉकडाऊन मधून अनेक बाबींना सवलती दिल्या जात आहेत, कलापथक कलाकारांच्या व्यथा मला माहित आहेत अगदी या पथकांच्या गाडीचे ड्रायव्हिंग करणार्या ड्रायव्हर पासून मेकअपमन पर्यंत या सर्वांच्या व्यथा मी जाणतो, त्यामुळेच कलापथकासह केवळ कला सादर करून उपजीविका करणाऱ्या सर्व कलाकारांच्या साठी राज्यशासन लवकरच सकारात्मक निर्णय घेऊन या सर्व कलाकारांना आपले कार्यक्रम सुरू करण्यासाठी परवानगी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेईल कलाकारांची आबाळ होऊ दिली जाणार नाही अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.

कोल्हापूर येथे कलापथक कलाकारांच्या संघटनेच्या वतीने आपल्या विविध मागण्यासाठी आमरण उपोषण सुरू केले होते, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कलाकारांच्या न्याय मागण्या बाबत लवकरच योग्य निर्णय घेत असल्याचे सांगत उपोषणकर्त्यांना उपोषण थांबवण्याबाबत आवाहन केले,राज्यमंत्री यड्रावकर यांच्या भेटीनंतर उपोषणाची सांगता करीत असल्याचे कलापथक कलाकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर करत राज्यमंत्री यड्रावकर यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन उपोषणाची सांगता केली सोबत माजी आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर उपस्थित होते, 

यावेळी कलापथक कलाकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुकुंद सुतार, उपाध्यक्षा श्रीमती शारदा हीलगे, रवी सुतार, चंद्रकांत लोहार, निवास कुंभार, प्रसाद कुलकर्णी, प्रकाश पाटील, शाहीर आझाद नायकवडी, संताजी मोहिते, रमेश खटावकर, रजनी गोरड यांच्यासह अनेक मान्यवर कलाकार उपोषणस्थळी होते.

Post a comment

0 Comments