मराठी कलाविश्वात शोककळा


 या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याच निधन! मराठी कला विश्वात शोककळा! 

PRESS MEDIA LIVE : 


सर्वांना सांगण्यात दुःख होतेय की मराठी चित्रपटात आणि नाटकात प्रसिद्ध असणारे जेष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे  दुःखद नि-धन झाले. अविनाश खर्शीकर यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे ठाणे येथे दुःखद नि-धन झाले. आणि अविनाश खर्शीकर यांची प्राणज्योत कायमची मालवली. आज सकाळी त्यांनी आपला अंतिम श्वास आपल्या राहत्या घरी सोडला. आपल्या सर्वांना माहित आहे कि अविनाश खर्शीकर हे एक प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांनी अनेक चित्रपटामध्ये तसेच नाटकांमध्ये उत्तम कामगिरी बजावली होती. तसेच त्यांनी अनेक मराठी तसेच हिंदी मालिकेमध्ये हि काम केले होते.

अविनाश खर्शीकर यांनी सिनेसृष्टीत प्रवेश १९७८ मध्ये ‘बंदिवान मी या संसारी’ या चित्रपटाद्वारे केला. त्यांच्या कारकिर्दीला ह्या चित्रपटापासूनच सुरुवात झाली. त्यांनी जसा बाप तशी पोरं, आधार, आई थोर तुझे उपकार, माझा नवरा तुझी बायको, चालू नवरा भोळी बायको, बकुळा नामदेव घोटाळे, घायाळ, लपवाछपवी, माफीचा साक्षीदार यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. तसेच “होत्या तुझं आहे तुजपाशी, सौजन्याची ऐशी तैशी, वासूची सासू, अपराध मीच केला, दिवा जळू दे सारी रात, लफडा सदन” ही त्यांची प्रसिद्ध नाटकं हि खूप गाजली आहे. प्रेक्षकांना हि नाटके खूप आवडली आहेत.

अविनाश खर्शीकर यांच्या लूकची देखील ९० व्य शतकात खूप चर्चा झाली होती. नेहमी हसत राहणे अविनाश खर्शीकर यांनी आपली पहिली दैनिक मालिका “दामिनी” मध्ये आपली मुख्य भूमिका साकारली होती. ९० व्या शतकातील मराठी सिनेसृष्टीतील अविनाश खर्शीकर हे एक देखण्या अभिनेत्यापैकी एक होते. आज ते आपल्यात नाही. परंतु आज हि त्यांनी केली उत्कृष्ट कामगिरी आपल्या डोळ्यासमोर येते. मला त्यांचे “वासूची सासू” नाटक खूप आवडते. माणूस किती हि टेन्शन मध्ये जरी असला तरी त्या नाटक मुले तो टेन्शन फ्री होऊन जायचा. अविनाश खर्शीकर यांच्या नि-धनानंतर चित्रपट दुनियेतील अनेक अभिनेत्यांनी व चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

Post a comment

0 Comments