प्रेस मीडिया लाईव्ह:
अर्जुन धुमाळे
इचलकरंजी शहराच्या आयुक्त मा. पल्लवी पाटील यांच्याकडून पूरक्षेत्र भागाची पाहणी केली , यावेळी शेळके मळा, नदी नाका, तोडकर मळा, काळा ओढा, पी बा पाटील मळा, देवमोरे मळा, बेडक्याळे मळा इत्यादी ठिकाणी पंचगंगा नदीस पूर आल्यानंतर निर्माण होणाऱ्या अडचणी ,अचानक होणारी नागरिकांची हेळसांड अशा वेगवेगळ्या अडचणी श्री बाळासाहेब कलागते,पैलवान श्री अमृत मामा भोसले श्री राहुल घाट यांनी इचलकरंजी शहराच्या आयुक्त पल्लवी पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्या.
या अडचणी विचारात घेऊन लवकरच त्यावर तोडगा काढण्यासंबंधी सूचना आयुक्तांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी प्रकाश पाटील, पापालाल मुजावर, तानाजी कोकितकर , प्रमोद बचाटे तौफिक मुजावर, कुंभार नागरिक उपस्थित होते.