#जागृत ओंकारेश्वर मंदिर#गणेश,पार्वती व शिवलिंग मूर्तीअसलेले एकमेव मंदिर
पांच शिखरांचे प्रबोधन स्थळपाळ
PRESS MEDIA LIVE :
आषाढी पौर्णिमेपासून श्रावण अमावस्या पर्यंत दररोज दर्शनासाठी ओंकारेश्वर मंदिरात भाविकांच्या रांगा लागतात मारवाडी समाजआषाढ पौर्णिमेपासून श्रावण पौर्णिमेपर्यंत शिव दर्शनासाठी पुण्य मानतो. तर पूर्ण श्रावण महिना शिवभक्तांसाठी पावन ठरतो .
पौराणिक व ऐतिहासिक काळात मंदिरांच्या उभारणी राजे - रजवाडे किंवा श्रीमंत लोकांकडून होत असत . परंतु या मंदिराच्या उभारणीत कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणीच्या कामगारांच्या घामातून मिळालेल्या पैशाचा मोठा वाटा आहे . या मंदिराची मूळ संकल्पना सूतगिरणीचे तत्कालीन कार्यकारी संचालक वसंत विनायक सहस्रबुद्धे यांची आहे त्यांच्या संकल्पनेला कामगारांनी बोनस रकमेतून पाच टक्के रक्कम मंदिर उभारणीसाठी दिली आहे .सौ विनया वसंत
सहस्रबुद्धे व श्री रामगोंडा कलगोंडा पाटील यांनी स्वतःची पार्वती गृहनिर्माण संस्थेतील जागा विनामूल्य दिली आहे .
मंदिराचा आराखडा हेमांडपंथी पध्दतीचा आहे.मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराची लांबी ६० फूट तर रुंदी ६० फूट आहे .मंदिरातील सभामंडप ३० फूट बाय ४० फुटाचा आहे.या मध्ये प्रवचन, कीर्तन, विवाह समारंभ , धार्मिक व प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात . सभामंडपाच्या उत्तर दिशेला १३ फूट बाय११ फूट आकाराचा भव्य दरवाजा करण्यात आला आहे .यामुळे दरवाजा बाहेरही मंडप उभारून मोठा समारंभ करता येतो.
मंदिरातील सर्व मूर्त्या मार्बलच्या आहेत शिवलिंग काळ्या मार्बल मध्ये ६फूट ३ इंच लांबीचा आहे. गणेश व पार्वती च्या मूर्त्या पांढऱ्या मार्बल मध्ये 3 फूट उंचीच्या आहेत. नंदी काळ्या मार्बलमध्ये ५ फूट लांबीचा आहे. कासव 1 फूट लांबीचा आहे. प्रत्येक मूर्तीला स्वतंत्र शिखर आहे.अशी पांच शिखरे आहेत. मुख्य शिखरावरील कळसाची उंची जमिनीपासून ५९फूट आहे.मंदिर प्रवेशद्वारासमोर १२ फूट उंचीची घडीव काळ्या दगडाची दीपमाळ आहे. सर्व मूर्त्या जयपूर येथील राष्ट्रपती पदक विजेते जगदिशनारायण रामकुमार पांडे यांनी घडविल्या आहेत.
मंदिराचा उत्तर दरवाजा १३ फूट बाय १२ फूट आकाराचा असून त्यावर हुबळी (कर्नाटक) येथील आय जी बडीगेर व त्यांच्या सहकारी कारागिरांनी सुंदर व आकर्षक कोरीव काम केले आहे.
ओंकारेश्वर मंदिरामध्ये श्रावण सोमवारी, व महाशिवरात्रीला पहाटे पासून शिवलिंगावर संतत दुग्धाभिषेक होतो . सकाळपासून दर्शनासाठी भाविकांनी रांगा लागतात . ओम नमः शिवाय जप ,शिवलीलामृत पठण , शिवसहस्र नामजप,भजन, कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम होतात. सायंकाळी मंदिर प्रदक्षिणा पालखी मिरवणूक व महाआरती तसेच प्रदोष महाअभिषेक झाल्यावर दैनंदिन कार्यक्रम पूर्ण होतात.
सण १९४८ साली बारा जोतिर्लिंगा पैकी एक असलेल्या सोरटी सोमनाथ येथे शिवाची ज्या विधीने पुनः प्रतिष्ठापना करण्यात आली, त्याच विधीने येथील ओंकारेश्वर मंदिरात प्राणप्रतिष्ठापणा सोहळा करण्यात आला.दि ७/१/१९८३ ते ११/ १ १९८३ या कालावधीत पुण्याचे प्रख्यात याज्ञीकाचार्य पंडित ग.गो.फाटक यांच्या पौराहित्या खाली प्राणप्रतिष्ठा विधी संपन्न झाला. यावेळी वेदांत केसरी मल्लिकार्जुन स्वामी विजापूर ,मल्लिकार्जुन महाराज (भोजकर )आडी- बेनाडी, विश्वकोशकार तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी या सर्व मान्यवरांसह देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार व त्यांच्या सौभाग्यवती पार्वतीदेवी कुंभार मृगेंद्र विष्णू सुलतानपूरे व सौ शांतादेवी मृगेंद्र सुलतानपूरे सहकार महर्षी शामराव पाटील याच्यासह वि. वि.सहस्रबुद्धे यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला यां प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे चित्रण आकाशवाणी ,दूरदर्शन, व फिल्म डिव्हिजन यांचे मार्फत करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त प्रवचन,किर्तन ,भक्ती गीत,नाट्यगीत," शिव संस्कृती परंपरा व प्रतिष्ठा" हे व्याख्यान तसेच सुश्राव्य गायन यासह विविध मनोरंजनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकरी सहकारी सूत गिरणी ली यड्राव -इचलकरंजी या संस्थेच्या माध्यमातून देशभक्त रत्नाप्पा कुंभार, मृगेंद्र आण्णा सुलतानपुरे व सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सूत गिरणीत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सहकार्याने व व्यापारी बंधूंच्या मदतीने मंदिर उभारणी झाल्याने हे मंदिर म्हणजे एक श्रम देवतेचे मंदिर मानले गेले आहे.
सण२००८ मध्ये मंदिराचा उद्योजक भरत लड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांच्या संघटनातुन जीर्णोद्धार करणेत आला.यावेळी लक्ष दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जीर्णोद्धार वेळी मंदिरासमोर मंडप घालणे करीता मंदिर आवारातील औदुंबर वृक्षाच्या फांद्या तोडल्या होत्या.मंदिरामध्ये उदबत्ती चा धूर होतो म्हणून झाडाखाली दगडी लहान शिवलिंग(महादेवाची पिंड ) ठेवून त्या पुढे उदबत्ती लावण्याची व्यवस्था पहिल्या पासूनच आहे . जीर्णोद्धार वेळी मंदिरावरील कळस पुन्हा बसवणे च मुहूर्त पहाटेच्या वेळेचा होता. पहाटेच्या वेळी मंदिरावर कलशारोहन होत असताना मंडपा मध्ये पाणी पडल्याचा आवाज येत होता त्याची पाहणी केली असता ,लहान दगडी पिंडीवर औदुंबर वृक्षाच्या तुटलेल्या फांदी मधून येत असलेली पाण्याची धार वृक्षा खाली असलेल्या दगडी पिंडीवर संतत धारे प्रमाणे जलाभिषेक होत होता.एक चमत्कारिक व अदभुत अनुभव तिथे उपस्थित असलेल्या भाविकांनी अनुभवला ही संततधार एक तासाहून अधिक काळ सुरू होती. हा प्रकार नैसर्गिक, दैवी ,की आणखी काही समजला तरी मंदिरा मध्ये बऱ्याच भाविकांनी अनुभवलेली घटना आहे.
सध्या आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर हे मंदिराचे विश्वस्त आहेत तर मंदिराचे व्यवस्थापन भरत लड्डा हे पाहतात.
माहिती संकलन व फोटो --घन:शाम कुंभार (पत्रकार)