AdSense code पुणे वारज्यात स्वातंत्र्यदिनी कोरोना योद्ध्यांचा सन्मान.

पुणे वारज्यात स्वातंत्र्यदिनी कोरोना योद्ध्यांचा सन्मान.

वारज्यात स्वातंत्र्य दिनी कोरोना योद्ध्यांचा  सन्मान.

PRESS MEDIA LIVE : पुणे.

कोरोना विषाणू साथीच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता योगदान देणाऱ्या कोरोना योध्यांचा,सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान स्वातंत्र्य दिनी भारतीय जनता पक्षाचे  पालिकेतील स्वीकृत  सदस्य सचिन दशरथ दांगट यांच्या वतीने करण्यात आला. 

  या कार्यक्रमात पैंगबर शेख, आलम पठाण (सोशल मिडिया फाऊंडेशन) ऋतृराज दिक्षीत, सचिन सावंत (आरोग्य निरीक्षक, पुणे मनपा),पराग ढेणे (सामाजिक कार्यकर्ता),अक्षय बराटे (ऋणानुबंध संस्था) डाॅक्टर राजेंद्र खेडेकर,(श्रीज्ञानयोग सेवा ट्रस्ट),तुफैल शेख, सरफराज सय्यद (हेल्पींग हॅन्डस् फाऊंडेशन),जावेद शेख,रफीक शेख,ऊम्मेद जांगिड आदींचा कोरोना योध्दा म्हणुन सन्मानचिन्ह,प्रशस्तीपत्रक,शाॅल,फुल देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. 

       याप्रसंगी सचिन मोरे(अध्यक्ष खडकवासला भाजपा),किरण बारटक्के(चिटणीस,पुणे भाजपा),अरविंद जोशी,रेणुका मोरे,वर्षा पवार,परशुराम पुजारी,अमजद अन्सारी,किरण साबळे,आनंद देशपांडे यांचेसह संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

      या कार्यक्रमाचे संयोजन  पुणे पालिकेचे स्वीकृत सभासद सचिन दशरथ दांगट यांनी केले होते. माळवाडी वतीने कोरोना कोवीड १९ या महाभयानक विषाणू साथीमध्ये  सामाजिक बांधिलकी म्हणुन गरजवंत लोकांना जेवण, कोरडा शिधा,अर्सेनिक अल्बम गोळ्या, मास्क,औषधे फवारणी आदी कामामध्ये सहभाग घेऊन समाजाप्रती आपले कर्तव्यात कुठेही कमी पडले नाहीत अश्या सर्वाचा कोरोना योध्दा म्हणुन  सन्मान केला गेला

Post a comment

0 Comments