प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर : १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून, ११ वे मराठी साहित्य संमेलन व संवाद परिषद २०२५ - अभिजात मराठी भाषेचा प्रेरणादायी महोत्सवाचे न्यूज पेपर गंगाधरच्यावतीने, रोटरी सभागृह कोल्हापूर येथे 'सन्मान किर्तीवंतांचा - गौरव महाराष्ट्राचा' या उपक्रमा अंतर्गत शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ठ व यशस्वी कार्याबद्दल राज्यस्तरीय आदर्श शिक्षका पुरस्काराने साधना हायस्कूल गडहिंग्लजच्या सौ. साधना नाईक यांना शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव मा. डॉ. व्ही .एन. शिंदे यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.
सौ. सुनिता संजय नाईक या साधना हायस्कूल गडहिंग्लज येथे डॉजबॉल खेळाच्या राज्य व राष्ट्रीय क्रिडा प्रशिक्षिका म्हणून गेली १५ वर्षे कार्यरत आहेत.
त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली मुलामुलींनी राज्य व राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर डॉजबॉल स्पर्धेसाठी नेपाळ, बुलढाणा, अमरावती, लातूर, लखनौ, दिल्ली आदी. अनेक ठिकाणी यश प्राप्त केले आहे. त्यांनी एक कुशल संघटक म्हणून नावलौकिक प्राप्त केलेला आहे.
त्याचबरोबर सामाजिक कार्यात गरजू महिलांसाठी बचत गट, वैद्यकीय सुविधा, कामगार योजनांमध्ये स्वयंपूर्ण सहभाग, पारंपारिक झिम्मा फुगडी यामध्ये महिलांना सामावून घेऊन विविध सामाजिक गुणदर्शन कार्यक्रमात सहभाग घेत असतात.
सदर पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख उपस्थितांमध्ये जेष्ठ साहित्यिक मा .विजय जोशी( मुंबई ) व मा . प्रभाकर कुलकर्णी( नाशिक) मा . किसनराव कुराडे सर आदी. मान्यवर उपस्थित होते.
सौ. सुनिता नाईक यांच्या आजअखेरच्या यशस्वी वाटचालीमध्ये साधना शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव मा. जे. बी. बारदेस्कर, संचालक मा. अरविंद बारदेस्कर, संचालिका फिलोन बारदेस्कर, मुख्याध्यापक आय. पी. कुटिन्हो व साधना हायस्कूलचा सर्व स्टाफ आदींचे सहकार्य लाभले असल्याचे त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
सौ. सुनिता नाईक यांना क्रिडा व सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल, राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे, त्यांच्यावर समाजातील सर्वच स्तरातून अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.