आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोशी असोसिएट्स तर्फे

 

आतंरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएटस तर्फे समाजातील मान्यवरांचे सन्मान 

PRESS MEDIA LIVE :    गणेश राऊळ  | वरिष्ठ उपसंपादक

सावंतवाडी : आतंरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स हि संघटना सन्माननीय अ‍ॅडव्होकेट विक्रांतजी वाघचौरे यांच्या नेतृत्वाखाली मागील कित्येक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून टाटा कॅन्सर पेशंट व त्यांच्या नातेवाईकांसाठी दर सोमवार व गुरुवारी मोफत अन्नदान, आश्रम शाळेतील लहान मुलांना फळे वाटप,विध्यार्थी गौरव, विद्यार्थी मार्गदर्शन, रक्तदान शिबीर, गरीब व गरजू व्यक्तींना मदत करणे अश्या प्रकारचे विविध समाजपयोगी उपक्रम राबविले जातात. 

जगभरात कोरोना या साथीच्या रोगाने जगभरात थैमान घातलेले आहे अश्या परिस्थितीत घरातून बाहेर पडणे देखील मुस्कील झालेलं असताना विविध क्षेत्रातील समाजसेवक, डॉक्टर, पत्रकार, सफाई कर्मचारी, शासकीय कर्मचारी, पोलीस, आजी माजी पुढारी आपला जीव धोक्यात घालून आज सदर परिस्थितीवर मात करत आपली सेवा समाजात प्रदान करीत आहेत 

 कौतुकाची थाप म्हणून आतंरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएटस तर्फे अ‍ॅडव्होकेट विक्रांतजी वाघचौरे यांच्या नेतृत्वाखाली, राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी सन्माननीय समीरजी परब यांच्या मार्गदर्शनाखाली, IHRA युथ सेल महाराष्ट्र संचालक सन्माननीय गणेश राऊळ यांच्या सहकार्याने  विविध क्षेत्रातील अश्या  मान्यवरांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येत आहे.  त्यामध्ये विशेष करून सावंतवाडी मधील समाजसेवक माजी शिक्षण सभापती सन्माननीय मंगेश तळवणेकर तसेच तरुण भारत चे जेष्ठ पत्रकार, पत्रकार संघ सावंतवाडी चे तालुका अध्यक्ष सन्माननीय विजय देसाई यांना संघटनेने प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले असता त्यांनी संघटनेचे आभार मानले व संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा  दिल्यात.

Post a comment

0 Comments