पुणे. लालपरी पुन्हा धावू लागली

लालपरी पुन्हा धावू लागली

 

PRESS MEDIA LIVE.COM :  पुणे : मोहम्मद जावेद मौला.

पुणे - लॉकडाऊनच्या कालावधीत स्थगित असणारी एसटीची बससेवा पुन्हा धावण्यास सुरुवात झाली आहे. मागील सोमवारपासून स्वारगेट आणि वाकडेवाडी स्थानकातून 4 मार्गांवर बसेस सोडण्यात येत होत्या. या मार्गांमध्ये वाढ करण्यात आली असून, पूर्वीच्या तिकीट दरात ही सेवा देण्यात येणार आहे.

लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर टप्प्याटप्प्यात ग्रामीण भागात एसटीची सेवा सुरू करण्यात आली. मात्र, करोनामुळे स्वारगेट आणि वाकडेवाडी या स्थानकात बसेस येत नव्हत्या. मात्र, मागील सोमवारपासून येथूनही बसेस सुरू झाल्या आहेत. यामध्ये बारामती, भोर, इंदापूर, जुन्नर, आळेफाटा, नारायणगाव आदी ठिकाणांचा समावेश होता. शनिवारपासून प्रशासनाने या मार्गांमध्ये वाढ करण्याचा या प्रवासासाठी कोणत्याही ई-पासची आवश्‍यकता नसल्याचे एसटी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

या मार्गांवर सुरू होणार बसेस

1. बारामती, भोर, शिरूर, सासवड, नारायणगाव, राजगुरुनगर, इंदापूर, जुन्नर, नीरा, आळेफाटा, भिमाशंकर, वेल्हा या स्थानकांतून पुण्यासाठी बसेस सोडण्यात येणार आहेत.

2. दौंड-पाटस-पुणे, पौड-मुळशी- पुणे, बारामती-नीरा, बारामती-भिगवण, बारामती-वालचंदनगर, बारामती-इंदापूर, बारामती-दौंड, स्वारगेट-वेल्हा, तळेगाव-चाकण-शिक्रापूर, नारायणगाव-जुन्नर, जुन्नरयेथून देवळे, तांबे, दावडी, आंबोली, भिवाडे, घोडेगाव, भोर-म्हसर, धोंडेवाडी, टीटेघर, कोर्ले.

3. सासवड येथून यवत, वीर, राख निरा, राजगुरुनगर येथून पाबळ, बहिरवाडी, वांद्रा, वाडा, भोरगिरी, चिंचोशी, दावडी, साबुर्डी, मंचर येथून कारखाना, कुरवंडी, चास-घोडेगाव, अवसरी या मार्गांवर बसेस धावणार आहेत. घेतला आहे.

Post a comment

0 Comments