पुणे. फार्महाऊस आणि पर्यटनस्थळी

फार्म हाऊस आणि पर्यटनस्थळी 'कोरोना किलर' द्वारा सुरक्षितता 

PRESS MEDIA LIVE : पुणे :

15 ऑगस्ट सुटीला  अनलॉकमधील सुरक्षिततेचे नियम पाळून फार्महाउस आणि पर्यटन स्थळांकडे जाण्याचा ओढा वाढत असून या ठिकाणी कोरोना विषाणू साथी पासून सुरक्षित राहण्यासाठी 'कोरोना किलर' या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची मदत होत आहे

'जिजाई गार्डन'या फार्म हाऊसचे संस्थापक संजय बाबुराव बराटे  यांनी आपल्या मुखाई(ता.शिरूर,जिल्हा-पुणे) येथील फार्महाऊसवर कोरोना किलर हे इलेक्ट्रॉनिक उपकरण बसवले आहे. येणाऱ्या पर्यटकांना कोरोना विषाणू पासून सुरक्षित ठेवण्यासाठी हे संशोधन त्यांनी वापरले आहे. आयोनायझेशन च्या माध्यमातून हे इलेक्ट्रॉनिक उपकरण वातावरणातील कोरोना सारखे विषाणू,बॅक्टेरिया आणि बुरशी नष्ट करते.आयसीएमआर,एनआयव्ही,नायडू हॉस्पिटल अशा मान्यताप्राप्त संस्थांनी या उपकरणाला कार्यक्षमता प्रमाणपत्र दिलेले आहे, असे या उपकरणाचे संशोधक इंडोटेक इंडस्ट्रियल सोल्युशन्स प्रा.लि.या कंपनीचे अध्यक्ष भाऊसाहेब जंजिरे यांनी सांगितले. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर असलेल्या भाऊसाहेब जंजिरे यांनी हे संशोधन करून सर्वांसाठी उपलब्ध केले आहे.

 फार्म हाऊस आणि पर्यटनस्थळांवर राहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना वातावरणातील विषाणू नष्ट करून सुरक्षित राहता येणे या उपकरणामुळे शक्य झाले आहे असे 'जिजाई गार्डन'या फार्महाउस चे संचालक संजय बाबुराव बराटे  यांनी सांगितले.या फार्म हाउसचा गृह प्रवेश समारंभ १३ ऑगस्ट रोजी झाला. त्यावेळी हे उपकरण बसविण्यात आले                                                                                                    

*

Post a comment

0 Comments