आपल्या जिवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या.

आपल्या जिवाची पर्वा न करता  कर्तव्य बजावणाऱ्या

       पुणे पोलिसांना ‘सॅल्युट

PRESS MEDIA LIVE :. पुणे : (मोहम्मद जावेद मौला )

  ( पुणे जिल्हा प्रतिनिधी)

पुणे – पुणे शहर पोलीस दलात आतापर्यंत 561 जणांना करोनाची लागण झाली असून त्यामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. लागण होण्याच्या तुलनेत करोनावर मात करणाऱ्या पोलिसांचे प्रमाण मोठे असल्याचे दिसून येते. संसर्ग झालेल्या 561 पैकी तब्बल 426 जणांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर, आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे.

पुणे पोलीस दलातील सध्या 132 जण शहरातील विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. तर 45 जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता येण्यापूर्वी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये म्हणून रस्त्यासह संक्रमणशील भागात बंदोबस्ताला पोलीस होते. त्यांची प्रतिबंधात्मक काळजी घेतली जात असताना देखील या-ना त्या कारणातून पोलिसांचा नागरिकांशी संपर्क आल्याने करोनाची लागण होत होती

शहर पोलिसांची कर्तव्यादरम्यान घेतली जाणारी प्रतिबंधात्मक काळजी, रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी देण्यात आलेली प्रोटीनयुक्त औषधे, साधने याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. यातूनच करोनावर यशस्वी मात केल्यानंतर बरे झालेले 50 टक्के पेक्षा अधिक पोलीस पुन्हा आपल्या कर्तव्यावर हजर झाले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post