प्रेस मीडिया लाईव्ह

 खासदार संजय जाधव यांनी राजीनामा दिलेलाच नाही- एकनाथ शिंदे

         परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील बैठक संपली आहे. या बैठकीला परभणीचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते-मंत्री नवाब मलिक आणि शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून गळचेपी होत असल्याचा परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांचा आरोप होता. त्यांनी यामुळे काल पक्षाचा राजीनामा दिल्याचं वृत्त देखील समोर आलं होत. पण शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी हे वृत्त फेटाळलं आहे.एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, 'खासदार संजय जाधव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले. त्यांची कोणतीही नाराजी नाही.

शरद पवार सतर्क; काँग्रेसमधील घडामोडींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी विश्वासू शिलेदारांवर

        काँग्रेस पक्षामध्ये निर्माण झालेल्या अंतर्गत समस्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे चिंताग्रस्त आहेत. काँग्रेस हा विरोधी पक्षांतील महत्त्वाचा दुवा असून तो दुर्बळ होऊ नये म्हणून त्या पक्षातील स्थितीवर बारीक लक्ष ठेवण्याची कामगिरी पवार यांनी आपले विश्वासू सहकारी व खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर सोपविली आहे. काँग्रेसमधील घडामोडींची खडान्खडा माहिती त्वरित द्यावी, असेही पवार यांनी पटेल यांना सांगितले आहे.काँग्रेस पक्ष आणखी क्षीण झाला तर त्याचा परिणाम देशातील ज्या राज्यांत विरोधी पक्षांची सरकारे आहेत, त्यांच्यावर होण्याची शक्यता आहे. तो धोका वेळीच ओळखून शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे खास जबाबदारी दिली आहे. त्यामुळेच पटेल हे मंगळवारी तातडीने मुंबईहून दिल्लीत परतले व आता दिल्लीतच तळ

मुंबई पोलिसांच्या तपासात कोणताही दोष नाही- अनिल देशमुख

         अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'मुंबई पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तपास केला. ही अभिमानाची गोष्ट आहे', अशी प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने आज घेतला आहे. आतापर्यंत गोळा केलेले पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत.'मुंबई पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तपास केला. ही अभिमानाची गोष्ट आहे. सुप्रीम कोर्टाने आपल्या जजमेंटमध्ये मुंबई पोलिसांनी या प्रकरणात कलम १७४ अंतर्गत जो तपास केला, त्यात कोणताही दोष आढळला नाही.

महाराष्ट्रात १३ हजार १६५ नवे कोरोना रुग्ण , ३४६ मृत्यूंची नोंद

         महाराष्ट्रात १३ हजार १६५ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये ९ हजार ११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या ही ६ लाख २८ हजार ६४२ इतकी झाली आहे. यापैकी ४ लाख ४६ हजार ८८१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ७१. ९ टक्के झाला आहे. तर मागील २४ तासांमध्ये ३४६ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मृत्यू दर ३.३५ टक्के इतका झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. ठोकून आहेत.

Post a comment

0 Comments