पुणे. आझम कॅम्पसच्या फेसबुक लाईव्ह ...


आझम कॅम्पसच्या  फेसबुक लाईव्ह 'नमाज-ए-जुम्मा 'ला पुण्यात पंधराव्या  आठवड्यात प्रतिसाद                                                                                

 कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम बांधवांचा घरातून सहभाग                                  


PRESS MEDIA LIVE : पुणे :

कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर सामूहिक नमाज पठण करू नये, या आवाहनाचे पालन करीत पुण्यातील आझम कॅम्पस मशिदीत 'नमाज-ए-जुम्मा '  चे 'फेसबुक लाईव्ह' द्वारे थेट प्रक्षेपण करण्यात  आले . 

सलग पंधराव्या आठवडयात या उपक्रमाला प्रतिसाद मिळाला. आज  शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी  दुपारी दीड वाजता 'फेसबुक लाईव्ह' पठण  करण्यात आले .  मुस्लीम बांधवांनी या उपक्रमाला प्रतिसाद देत घरातून सहभाग घेतला.

आझम कॅम्पस शैक्षणिक,सामाजिक परिवाराचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांनी पत्रकाद्वारे या उपक्रमाची माहिती दिली.  आझम कॅम्पस मशिदीमध्ये पेश इमाम असलेले मौलाना नसीम अहमद यांनी या उपक्रमादरम्यान  नमाज पठण केले.तर  आझम कॅम्पस च्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमीन शेख यांनी तांत्रिक बाजू सांभाळली.

 

येथे दर आठवड्यात   शुक्रवारी दुपारी दीड वाजता जुम्मा नमाझचे फेसबुक लाईव्ह द्वारे पठण करण्यात येते. मशिदीच्या पेश इमाम यांच्या मार्गदर्शना खाली घरी  नमाज पठण करणे नव्या तंत्रज्ञानाच्या वापराने शक्य झाले असून २९ मे पासून हा उपक्रम दर शुक्रवारी  सुरु आहे. अशा स्वरूपाचा हा पहिलाच उपक्रम आहे.या तंत्रामुळे मशिदीत गर्दी होत नाही,फक्त पेश इमाम मशिदीतून नमाज पठण करतात आणि इतरांना घरातून त्यात सहभागी होणे शक्य होते.दर शुक्रवारी दुपारी दीड वाजता हा उपक्रम होतो.

एरवी शहराच्या विविध भागात मशिदींमध्ये शुक्रवार (जुम्मा) दिवशी सामूहिक नमाज पठण केले जाते.कोरोना संसर्गचा  धोका लक्षात घेऊन  शुक्रवारी मशिदीत जाता येत  नाही. त्या सर्वांना या फेसबुक लाईव्ह नमाज पठणाचा लाभ होत आहे.आझम कॅम्पस या फेसबुक पेज वर हे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येते.प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांनुसार सोशल डिस्टन्स चे नियम पाळण्यात येतात. पुढील लिंक द्वारे या नमाज पठणात सहभागी होता येते.  https://www.facebook.com/azamcampus1922

  कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर रमजान ईद च्या दिवशी देखील सकाळी ८ वाजता आझम कॅम्पस मशिदीमध्ये पेश इमाम असलेले मौलाना नसीम अहमद यांनी ईद साठीचे नमाज पठण केले होते. तसेच बकरी ईदला देखील गर्दी न करता हा उपक्रम करण्यात आला.                                                                                                                                  

Post a Comment

Previous Post Next Post