भाजपचे लोकप्रतिनिधी यांच्यासह जिल्ह्यात 280

 

मिरज येथील भाजपचे लोकप्रतिनिधी यांच्यासह जिल्यातील 280 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

PRESS MEDIA LIVE :.  मिरज : 

मिरज येथील भाजपचे लोकप्रतिनिधी यांच्यासह जिल्ह्यात बुधवारी 280 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या. यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील 122 व जिल्ह्याच्या उर्वरित भागातील 158 व्यक्‍तींचा समावेश यात आहे. बुधवारी जिल्ह्यातील 11 व्यक्‍तींचा व परजिल्ह्यातील 2 व्यक्‍तींचा मृत्यू झाला. एक पोलिस कर्मचारी व एका प्राथमिक आरोग्य केंद्राकडील लिपिक यांचा कोरोनाने मृत्यू झाला. बुधवारी जिल्ह्यातील 489 व्यक्‍ती कोरोनामुक्‍त झाल्या. एका दिवसात एवढ्या संख्येने कोरोनामुक्त होण्याचा हा उच्चांक आहे. जिल्ह्यात बुधवारअखेर एकूण कोरोनामुक्त व्यक्तींची संख्या 5 हजार बुधवारअखेर एकूण कोरोनामुक्त व्यक्तींची संख्या 2 हजार 781 झाली आहे. सध्या 2 हजार 313 व्यक्ती उपचाराखाली आहेत. त्यापैकी 212 व्यक्तींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यातील 170 व्यक्ती ऑक्सिजनवर, 47 व्यक्ती नॉन इन्व्हेजीव व्हेन्टीलेटरवर, 1 व्यक्ती हायफ्लो नेझल ऑक्सिजनवर आणि 3 व्यक्ती इन्व्हेजीव व्हेन्टीलेटरवर आहेत. बुधवारअखेर एकूण मृत व्यक्तींची संख्या 176 झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली

सांगली महापालिका क्षेत्रातील 122 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या. यामध्ये सांगलीतील 82 व मिरजेतील 40 व्यक्तींचा समावेश आहे. मिरज येथील भाजपचे लोकप्रतिनिधी कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची पत्नी, मुलगा, सून, दोन नातवंडे यांना होम आयसोलेशन केले आहे वाळवा तालुक्यातील केदारवाडी येथील 9, वाटेगाव येथील 6, रेठरेहरणाक्ष येथील 1, नेर्ले येथील 1, काळमवाडी 2, सुरूल 1, बागणी 2, वाळवा 1, इस्लामपूर 2, कुरळप 1, ताकारी येथील 3 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या. आटपाडी तालुक्यातील दिघंची येथील 1, आटपाडीतील 4, करगणी येथील 2 व्यक्ती तसेच आटपाडी ग्रामीण रुग्णालयातील 2 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या.

                जत चे पोलिस अधिकारी पॉझिटिव्ह

जत पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आले. शहरातील एक व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह आले. अंकले व आवंढी येथील प्रत्येकी एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली.

कडेगाव येथील 7, आसद 1, सोनकिरे 1, शिवाजीनगर 1, शाळगाव येथील 3 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या. कवठेमहांकाळ तालुक्यातील विठुरायाचीवाडी येथील 1, कवठेमहांकाळ येथील 4, शिरढोण येथील 1, गर्जेवाडी 1, हिंगणगाव येथील 1 व्यक्ती पॉझिटिव्ह आली. खानापूर तालुक्यातील 4, मिरज तालुक्यातील 37, पलूस तालुक्यातील 7 व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या. शिराळा तालुक्यात शिराळा 4, मांगरूळ 2, मांगले 2, वाडीभागाई येथील 1 व्यक्ती पॉझिटिव्ह आली आहे. तासगाव येथील 5, कवठेएकंद येथील 11, डोंगरसोनी येथील 1, लोकरेवाडी येथील 4, पाडळी येथील 1 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे.

सांगली येथील 73 वर्षीय पुरूष, भोसे (मिरज) येथील 38 वर्षीय पुरूष, कुपवाड येथील 46 वर्षीय पुरूष आणि 68 वर्षीय पुरूष, सांगली येथील 65 वर्षीय पुरूष, कोकरूड (ता. शिराळा) येथील 65 वर्षीय पुरूष, धोंडगेवाडी (ता. खानापूर) येथील 55 वर्षीय पुरूष, सांगली येथील 64 वर्षीय आणि 69 वर्षीय पुरूष, मिरज येथील 33 वर्षीय पुरूष, वसगडे (ता. पलूस) येथील 85 वर्षीय पुरूष यांचा मृत्यू झाला.

कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील 34 वर्षीय पुरूष आणि इचलकरंजीयेथील 62 वर्षीय पुरूष यांचा मृत्यू झाला. झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post