15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्ह्यात

    

15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी किंवा सार्वजनिक स्वरूपात मिठाईचे वाटप करू नये

जिल्हाधिकारी दौलत देसाई.                                    

PRESS MEDIA LIVE : कोल्हापूर :

कोल्हापूर : 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्ह्यात कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी किंवा सार्वजनिक स्वरूपात मिठाई, जिलेबी वाटपाचे कार्यक्रम घेण्यात येवून नये, याबाबत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज आदेश दिले आहेत.

जिल्हादंडाधिकारी कोल्हापूर श्री. देसाई यांना असलेल्या अधिकारास अनुसरुन दिनांक 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्वातंत्र दिनानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात मिठाई, जिलेबी वाटप व विक्री करणाऱ्या आस्थापनांसाठी खालील प्रमाणे मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्यात आल्या आहे.को कोणत्याहीकारे सार्वजनिक ठिकाणी किंवा सार्वजनिक स्वरुपात मिळाई, जिलेबी वाटपाचे कार्यक्रम घेण्यात येऊ नयेत व गर्दी होईल असे कृत्य करु नये.आस्थापना चालक/कर्मचाऱ्यांनी संरक्षक साधने जसे की, हातमोजे (हॅन्ड ग्लोव्हज), ॲप्रन व मास्क वापरणे असेत योग्य ते सामाजिक अंतर राखणे बंधनकार असेल. आस्थापनेतील सर्व कार्यखेत निर्जंतुकीकरण करणे बंधनकारत असेल, तसेच सर्व सामाईक वापर क्षेत्रे व पृष्ठभाग प्रत्येकी दोन तासांनी निर्जंतुकीकरण करणे बंधनकार असले.

आस्थापनेती येणाऱ्या ग्राहकांसाठी भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार योग्यते सामाजिक अंतर राखण्यासाठी मार्किंग करणे बंधनकारक असेल, तसेच एका वेळी पाच पेक्षा जास्त ग्राहक आस्थापनेत एकत्र येणार नाही यांची काटेकोरपणे दक्षता घेणे बंधनकारक आहे. आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) यांच्या कलम 188 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतूदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

Post a comment

0 Comments