त्या स्वस्त धान्य दुकान चा परवाना..

हातकणंगले येथील त्या स्वस्त धान्य दुकानचा परवाना रद्द करण्याचा अहवाल.




PRESS MEDIA LIVE : हातकणंगले :

हातकणंगले - लॉकडाऊनच्या काळात बिगर रेशनकार्ड धारकांना मोफत वाटपासाठी आलेल्या हजारो किलो धान्याची हातकणंगलेतील काही लोकप्रतिनिधींनी परस्पर विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी नगरसेवकांच्या दबावाला बळी पडत चुकीच्या पद्धतीने धान्य वाटप केल्याचा ठपका ठेवत सबंधित स्वस्त धान्य दुकानाचा परवानाच रद्द करण्याचा अहवाल तालुका पुरवठा विभागाने जिल्हा पुरवठा कार्यालयांकडे पाठवला आहे.

 त्या लोकप्रतिनिधींवर काय कारवाई होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे  कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर रेशनकार्ड ऩसलेले नागरिक रेशनकार्डाअभावी धान्यापासून वंचित राहू नयेत यासाठी शासनाने आत्मनिर्भर योजनेअंतर्गत मे आणि जून दोन महिन्यांसाठी माणसी प्रतिमहिना पाच कलो तांदूळ मोफत यासाठी हातकणंगले नगरपंचायतीने ६७७ बिगर कार्डधारकांची यादी शासनाकडे सादर केली.

त्यानुसार शासनाने एका स्वस्त धान्य दुकानाकडे सहा हजार सातशे सत्तर किलो तांदूळ वाटपासाठी पाठवले. मात्र येथील काही नगरसेवकांनी हे धान्य आपल्या ताब्यात घेऊन परस्पर वाटप केले. त्यामुळे अनेक मूळ लाभार्थी यापासून वंचित राहीले. या प्रकाराची गेले काही दिवस शहरांत दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. त्या नंतर तहसीलदारांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार तालुका पुरवठा अधिकारी संजय पुजारी यांनी पाच जणांचे जबाब नोंदवले. यात संबधित धान्य दुकानदार सकृतदर्शनी दोषी आढळल्याने त्या धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्याची शिफारस केली आहे

याबाबत एका सामाजिक कार्यकर्त्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. मात्र गेल्या दोन- तीन दिवसांपासून त्याच्यावर काही राजकिय मंडळीकडून तक्रार मागे घेण्यासाठी दबावतंत्राचा वापर सुरू असून याची जोरदार चर्चा सुरू आहे. योजना जाहीर केली होती.

Post a Comment

Previous Post Next Post