ऐतिहासिक नगरी माणगाव येथे अद्यावत कोविड हेल्थ केअर सेंटरचे


ऐतिहासिक नगरी माणगाव येथे अध्यावत  कोविंड हेल्थ केअर सेंटरची उभारणी सुरू.



PRESS MEDIA LIVE :   रुकडी :

रुकडी  - ऐतिहासिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तसेच महाराष्ट्र शासनाचा ' स्मार्ट ग्राम' व कोल्हापूर जिल्हा परिषदेचा 'यशवंत ग्रामपंचायत' पुरस्कार मिळविलेल्या माणगाव (ता. हातकणंगले) येथे अद्यायावत कोविड हेल्थ केअर सेंटरची उभारणी सुरू आहे. ग्रामपंचायत माणगाव आणि वैष्णवी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने या सेंटरची सुरूवात करत असल्याची माहिती माजी उपसरपंच राजू मगदूम यांनी दिली.

सध्या कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे रुग्णांची संख्या दिवसागणित वाढत आहे. अशातच सरकारी आणि खाजगी रुग्णांमध्ये बेड उपलब्ध होणे कठीण झाले आहे. केवळ बेड मिळत नसल्याने रुग्णांना आपला जीव प्रशांत शिवाजी गवळी यांच्या माळभाग येथे असलेल्या स्वमालकीच्या हॉलमध्ये ५० बेडचे मोफत कोविड हेल्थ केअर सेंटर उभारणीचे काम सुरु केले आहे. जिल्हा परिषद सदस्या वंदना चंद्रकांत मगदूम यांनी कोल्हापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे माणगाव, माणगावाडी, साजणी, तिळवणी, रुई व पट्टणकोडोली सह परिसरातील गोरगरीब आणि गरजू कोविड-१९ रुग्णांसाठी मोफत कोविड केअर सेंटर सुरु करण्यासाठी कोविड सेंटरसाठी परवानगी मागितली होती. या मागणीची तत्काळ दखल घेत आरोग्य विभागाने परवाणगी देत ५० बेड, ऑक्सिजन सिलेंडर, ३२ प्रकारची औषधे तसेच पीपीई किट दिले.

दरम्यान, या मोफत कोविड सेंटरमध्ये माणगाव आणि परिसरातील डॉक्टर व मेडिकल असोशिएशन रुग्णांवर मोफत उपचार करणार आहेत तर गावातील नागरीक उत्स्फूर्तपणे स्वयंसेवक म्हणून काम करणार आहेत. सध्या रुग्णांसाठी चार सौचालय व दोन बाथरुम बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्याप्रमाणे रुग्णांना वैष्णवी चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत रुग्णवाहिका चोवीस तास उपलब्ध करुन देणार असून जेवण, चहा व नाष्टा याचीही सोय करण्यात येणार आहे. त्यामुळे माणगावसह परिसरातील रुग्णांना या सेंटरमुळे मोठा दिलासा मिळणार असून रुग्णांची होणारी हेळसांड काही प्रमाणात थांबेल असे मत माजी उपसरपंच राजू मगदूम यांनी यावेळी व्यक्त केले. लागत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post