पुणे : कोरोना :


ज्यादा बिल आकारल्या मुळे शहरातील जहांगीर हॉस्पिटलला नोटीस.
जुपिटर रुग्णालयालाही नोटीस.


PRESS MEDIA LIVE :. पुणे : ( प्रतिनिधी ) :

 करोना रुग्णाला जादा बिल आकारल्यामुळे शहरातील जहांगिर रुग्णालयाला नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचबरोबर उपचारातील हलगर्जीपणामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे ज्युपिटर रुग्णालयालाही नोटीस बजावण्यात आली आहे. तर अन्य 25 रुग्णालयांनी उपलब्ध खाटांची माहिती न दिल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे महापालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले. करोना रुग्णांवर उपचार केल्यानंतर जादा बिलाची आकारणी केल्याची रुबी हॉल रुग्णालयाविरोधात तक्रार मिळाली होती. त्यामुळे त्यांना नोटीस पाठवली आहे. तक्रारीबाबत रुग्णालय प्रशासनाने समाधानकारक उत्तर दिले नाही, तर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. तसेच ज्युपिटर रुग्णालयामध्ये एक व्यक्‍ती करोना पॉझिटिव्ह आढळला. त्याच्यावर तेथेच उपचार होणे आवश्‍यक होते. असे असताना रुग्णास अन्य रुग्णालयात नेण्यास सांगितले. या प्रकारामुळे आणि रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची तक्रार महापालिकेला मिळाली. त्यामुळे त्यांना नोटीस बजावली आहे,’ असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.

बेडस्‌ची माहिती अपडेट न करणेही अंगलट
रुग्णालयातील बेडस्‌ची माहिती एकत्र करण्यासाठी तसेच माहिती मिळण्यासाठी संगणकीय यंत्रणा उभारली आहे. यामध्ये शहरातील रुग्णालयांनी शिल्लक बेडस्‌ची माहिती देणे आवश्‍यक असते. व्हेंटिलेटरची सोय असलेल्या बेडस्‌ची माहिती काही रुग्णालयांकडून दिली जात नाही. त्यामुळे तेथे नक्की किती बेड शिल्लक आहेत, याची माहितीच मिळत नाही. व्हेंटिलेटर असलेले बेडस्‌च नसल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. त्याचबरोबर रुग्णांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात पाठवले जात आहे. त्यामुळे जी रुग्णालये माहिती देत नाहीत, त्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

करोना उपचारांबाबत नियम न पाळणाऱ्या खासगी रुग्णालयांविरोधात प्रशासन कडक पावले उचलत आहे. शहरामध्ये करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. “बेडस्‌ उपलब्ध असूनही रुग्णांना बेड मिळत नाहीत’. “जास्त बिलाची आकारणी करण्यात येते’ अशा अनेक तक्रारी महापालिका प्रशासनाकडे आल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने आता कारवाईला सुरुवात केली आहे.
– रुबल अग्रवाल, अतिरिक्‍त आयुक्‍त, मनपा

Post a comment

0 Comments