पुणे :


सर्व धर्मीय सण घरीच साजरे करण्याची भूमिका कौतुकास्पद : डॉ. पी ए इनामदार.




PRESS MEDIA LIVE :  पुणे : इकबाल मुलांनी.

कोरोना संक्रमणाच्या काळात सर्वधर्मीय सण सार्वजनिक रित्या साजरे न करता, घरीच किंवा ऑन लाईन साजरे करण्याच्या भूमिका सर्व धर्मिय बांधवांकडून घेतली जात आहे, त्यातून सामाजिक जबाबदारीचे भान व्यक्त होत आहे,लालबाग पासून पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सव साधेपणाने आणि छोट्या प्रमाणात साजरा करण्याची भूमिका स्तुत्य आहे,अशा शब्दात आझम कॅम्पस शैक्षणिक परिवाराचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांनी या सामाजिक पुढाकाराचे स्वागत केले.

एरवी सर्व धर्मीय सण मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात ,त्यातून सामाजिक अभिसरण होत असते ,मात्र,कोरोना विषाणू साथीच्या काळात संयम बाळगून ,भावनांना अावर घालून जे सामाजिक भान दाखवले जात आहे ,ते कौतुकास्पद आहे ,असे डॉ पी ए इनामदार यांनी म्हटले आहे . पंढरपूर वारीची शेकडो वर्षांची परंपरा या वर्षी शक्य तितक्या सुरक्षित पणे ,संयमी पणे पार पडली ,हे अत्यंत दुर्मिळ आणि स्वागतार्ह उदाहरण आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बकरी ईद च्या सणाच्या स्वरूपाबद्दल अल्पसंख्य मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंची बैठक घेतली ,याचाही उल्लेख पत्रकात करण्यात आला आहे .

आझम कॅम्पस ने कोरोना काळात मशिदीची जागा कोविड केअर सेंटर साठी उपलब्ध करून दिली होती.पुण्यात ईद साधे पणाने घरीच साजरी करण्यात आली आणि जुम्मा नमाज ऑन लाईन मशिदीतून ऐकविण्याची सुविधा आझम कॅम्पस ने उपलब्ध करून दिली आहे . २९ मे पासून चालू असलेल्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कॅम्पस च्या वतीने शिव छत्रपती जयंती ,महात्मा फुले पुण्यतिथी ,डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच महंमद पैगंबर जयंती १० हजार विद्यार्थ्यांच्या सहभागातून काढली जाते .मात्र ,यावर्षी डॉ आंबेडकर जयंती मिरवणूक रद्द करून प्रतिमेला वंदन करून साधेपणाने साजरी करण्यात आली,असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे . ———————————— (Media co ordination : Prabodhan Madhyam- News Agency. *Deepak Bidkar* 9850583518 Gauri Bidkar.)

Post a Comment

Previous Post Next Post