कॉम्प्युटर हार्डवेअर आणि मोबाईल दुरुस्ती विषयावर मोफत वेबिनार
PRESS MEDIA LIVE : पुणे : (प्रतिनिधी ) :
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या पै आयसीटी अकॅडमी तर्फे कॉम्प्युटर हार्डवेअर आणि मोबाईल दुरुस्ती विषयावर मोफत वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.कॉम्प्युटर हार्डवेअर विषयावरचा वेबिनार २५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता आणि मोबाईल दुरुस्ती विषयावरील वेबिनार २६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.इच्छुकांनी shorturl.at/bkwNZ या लिंकवर नावनोंदणी करावी,असे आवाहन करण्यात आले आहे.सहभागी होणाऱ्यांना प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. -