पुणे :

भारतीय जनता पक्षाच्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांनाही करोनाची लागण.
  मागील काही दिवसापासून राजकीय नेते करोनाच्या विळख्यात.


PRESS MEDIA :   पुणे :  (मोहम्मद जावेद मौला  पुणे शहर विशेष प्रतिनिधी ) :

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांनाही करोनाची लागण झाली आहे. टिळक यांच्यासह त्यांच्या आईलाही करोनाची बाधा झाली आहे. आमदार टिळक यांच्या वडीलांचे मागील आठवडयात निधन झाले होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांच्या कुटूंबातील सर्वाची करोना चाचणी करण्यात आली होती. त्यात, आमदार टिळक आणि त्यांच्या आईला करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. स्वत: मुक्ता टिळक यांनी ट्विटरवर वरून याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, या दोघींची प्रकृती स्थिर असून त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत तसेच त्यांना घरीच उपचारासाठी विलगीकरणात ठेवण्यात आले असल्याचे टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी सांगितले.मागील काही दिवसांपासून शहरातील राजकीय नेते करोनाच्या विळख्यात सापडले आहेत. महापालिकेचे महापौर, विरोधीपक्ष नेत्या, तसेच इतर पाच नगरसेवक करोना बाधित झाल्यानंतर भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर यांनाही करोनाची लागण झाली आहे, तर माजी महापौर वैशाली बनकर यांच्या कुटूंबियांनाही करोनाची बाधा झाला आहे. त्यानंतर आता आमदार टिळक यांना बाधा झाल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, कुटूंबातील एका सदस्याला करोनाची बाधा झाल्यानंतर खबरदारी म्हणून त्यांच्या कुटूंबातील सर्वाची चाचणी करण्यात आली होती. त्याचे अहवाल आले असून त्यात, या दोघींना करोनाची बाधा झाला आहे. शहरात करोनाचा शहरात प्रसार सुरू झाल्यानंतर टिळक या स्वत: सातत्याने नागरिकांच्या मदतीसाठी प्रत्यक्ष मतदारसंघात उतरून काम करत होत्या, या काळात गरजूंसाठी धान्यवाटप, महापालिकेसाठी आरोग्य किट, तसेच आमदार निधीतून वेगवेगळया उपक्रमांसाठी निधी दिला होता, करोना नियंत्रणाच्या बैठका तसेच नियोजन बैठकांमध्येही त्या सातत्याने कार्यरत होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post