पुणे सासवड :

सासवड : पुरंदर तालुक्यातील करोना रुग्णांची संख्या वाढू लागली.


   
PRESS MEDIA LIVE :   सासवड .

सासवड  -पुरंदर तालुक्‍यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज तालुक्‍यात 27 रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 146 झाली आहे. 27 रुग्णांपैकी 20 रुग्ण हे सासवड शहरातील असून, इतर सात रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. यात एक रुग्ण हा दौंडज एक वाल्हे, चार रुग्ण हे केतकावळे तर वाघापूर येथील एक आहेत. एकंदरीतच पुरंदर तालुक्‍यात आता करोनाने थैमान घालण्यास सुरूवात केली असून, शहरी भागासह ग्रामीण भागात देखील करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.

सासवड शहरात आढळलेल्या रुग्णांमध्ये सासवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकाऱ्याला करोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले. त्यांचा खासगी तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यासोबतच सासवड नगरपालिकेच्या माजी महिला नगरसेविका यांचाही कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे निदर्शनास आले आहे. पुरंदर तालुक्‍यातील सुपे येथे रविवारी (दि. 5) करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचे हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले आहे. यासोबतच तालुक्‍यातील करोनामुळे मृत रुग्णांची संख्या पाचवर पोहचली आहे

Post a Comment

Previous Post Next Post