पुणे मनपा :


या पुढे महापालिकेची सभा ऑनलाइन होणार.

PRESS MEDIA :.   पुणे :  (मोहम्मद जावेद मौला. )

पुणे  महापालिकेची मुख्य सभा या पुढे ऑनलाइन होणार असून, करोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्य सभेला प्रेक्षक गॅलरीमध्ये उपस्थित राहणाऱ्या नागरिकांना मात्र या ऑनलाईन सभेत सहभागी होता येणार नाही.

महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपरिषदा, नगरपंचायती यांनी त्यांच्या मुख्यसभा तसेच विविध विषय समित्यांच्या नियतकालिक सभांबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. करोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाकडून सुरक्षित अंतर आणि अनुषंगिक मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यानुसार महापालिकेने यापुढील मुख्यसभा “ऑनलाइन’ घेण्याचा निर्णय घेतला आहे. मागील महिन्यापासून जिल्हा परिषदेने त्यांची मुख्यसभा ऑनलाइन घेण्याला सुरूवात केली आहे. अन्य नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या नियोजित सभा, बैठका घेणे बंधनकारक आहे. तीन महिने या सभा नाही झाल्या किंवा एखादा सभासद सलग तीन महिने सभेला उपस्थित राहिला नाही, तर त्याचे सदस्यत्त्व जाऊ शकते. त्यामुळे सभा घेणे अनिवार्य आहे.महापालिकेतील सदस्य संख्या पाहता सर्वांनी एकत्रित जमणे धोक्‍याचे आहे. महापौर मोहोळ यांनी याआधीच मुख्यसभेत ही बाब स्पष्ट केली होती. मात्र करोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन, जमावबंदी यामुळे सलग दोन महिने सभा झाली नाही, त्यामुळे त्यांनी नुकतीच ही सभा घेतली होती. त्यात त्यांनी याविषयी सांगितले आहे.
फक्‍त “यांनाच’ परवानगी
ही सभा महापालिकेच्या मुख्यसभा सभागृहातच होणार आहे. सभेला केवळ महापौर, उपमहापौर, आयुक्‍त, नगरसचिव यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी प्रत्यक्षात उपस्थित राहतील. नगरसेवकांना येथे प्रत्यक्षात उपस्थित राहता येणार नाही, ते ऑनलाइन उपस्थित राहू शकतील. पण, गटनेत्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, असे नगरसचिव सुनील पारखी यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post