मिरज :


मिरज येथील शासकीय रुग्णालयातील कोरोना रुग्णालयात दिला जातो शिळा नास्टा.


PRESS MEDIA LIVE : मिरज.
येथील शासकीय रुग्णालयातील कोरोना रुग्णालयात शिळा नाश्ता दिला जात आहे. काही रुग्णांनी गुरुवारी हा नाष्टा नाकारला. मिरजेच्या कोरोना रुग्णालयात सध्या 122 इतके कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. याच रुग्णालयात निगेटिव्ह व कोरोना संशयित असेही सुमारे शंभरहून अधिक रुग्ण आहेत. या रुग्णांना रुग्णालयाकडून दररोज नाष्टा व जेवणाची व्यवस्था करण्यात येते. मात्र, गेल्या काही दिवसात रुग्णांना एकाच प्रकारचा नाश्ता दिला जात असल्याच्या तक्रारी आहेत. चार दिवसांपासून एकाच प्रकारचा नाश्ता दिला गेला. दुपारी हा नाश्ता दिला जातो. नाश्ता करण्याची वेळ टळून आज नाश्ता दिल्यानंतर काही रुग्णांनी हा नाश्ता नाकारला. रुग्णालय प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. हा नाश्ता दिला जातो.

Post a comment

0 Comments