वीज बिलामुळे नागरिकांचे डोळे झाले पांढरे.

वाढत्या वीज बिलामुळे जनतेला चांगलाच शॉक.
बिलाची रक्कम पाहून नागरिकांचे डोळे झाले पांढरे.


 
 PRESS MEDIA LIVE : पुणे :     ( मोहम्मद जावेद मौला )                               
महावितरणकडून नुकत्याच दिलेल्या वाढत्या वीज बिलामुळे जनतेला चांगलाच “शॉक’ बसला आहे. करोना महामारीमुळे सर्व जनजीवन ठप्प झाले आहे. अशा काळात माणूसकीच्या नात्याने मदत केली जात आहे. या संकटात महावितरणाकडून मात्र, लोकांना राजरोसपणे लुटण्याचे काम सुरु आहे. लॉकडाऊनमुळे गत चार महिन्यांची बिले देता आली नाहीत. यात महावितरण कार्यालयाचा दोष नाही हे आपण समजू शकतो. परंतू, नागरिकांचीही बाजू समजून घेण्याऐवजी त्यांना शॉक दिला आहे. वीज बिलाच्या पाठीमागे असलेला युनिट व वीज आकार तक्ता पाहिला तर हे सहज लक्षात येऊ शकते. एमटीआर ऑर्डरनुसार विद्युत नियामक आयोगाने दि. 1 एप्रिल 2020 या नवीन आर्थिक वर्षापासून युनिटच्या दरात वाढ केली आहे. 0-100 या युनिटमध्ये 0.41 पैसे, 101-300 या युनिटमध्ये 0.48 पैसे, 301-500 या युनिटमध्ये 0.42 पैसे, 501 ते 1000 या युनिटमध्ये 0.41 पैसे प्रति युनिट वाढवले आहेत. तर 1 हजार पर्यंत 0.81 पैसे कमी केले आहेत. उदाहरणादाखल पाहिले असता महिन्याला सरासरी 350 रुपये बील येणाऱ्या ग्राहकाला सध्याच्या चार महिन्याचे बील सर्वसाधारणपणे 1400 रूपयांच्या पटीत यायला काहीच हरकत नाही. परंतू, अशा ग्राहकाला हेच बील 2 हजार 160 रूपये इतके भरमसाठ आले आहे. म्हणजे चार महिन्याच्या बिलावर अजून दोन महिने जादा बील द्यावे लागत आहे.

सध्या ग्रामीण भागात चार बल्ब, दोन पंखे, टीव्ही, फ्रीज, इस्त्री, मिक्‍सर, मोबाईल चार्जिंग व अन्य इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे वापरली तरी त्यांचे सरासरी वापरलेले युनिट हे 100 युनिटच्या आतच येते. महावितरणाच्या निकषानुसार 100 च्या आत युनिटवर प्रति युनिट 3.46 इतका दर आहे. परंतू 100 युनिटच्या वर गेल्यामुळे हा दर 7.43 इतका गेला आहे. साहजिकच सदर बील हे डबल आले आहे. याचा अर्थ गेली 4 महिने महावितरणने ग्राहकांना बील न देवून दिलासा दिला की एकदम चार महिन्याचे बील देवून लुटले याचा शोध घ्यावा लागेल.

सध्य परिस्थितीत सर्व साधारणपणे एका ग्राहकाचे 4 महिन्याचे एकूण युनिट 270 इतके झाले आहे. हे युनिट अर्थातच 100 च्या आत नाही, त्यामुळे त्या ग्राहकाला 7.43 ने पैसे मोजावे लागत आहे. त्यामुळे अशा ग्राहकाचे बील 2 हजार 6 इतके होत आहे. परंतू, त्याला 2 हजार 180 रूपये इतके बील आले आहे. 270 युनिटचे 4 महिन्यात विभाजन केल्यास प्रति महिना 67.5 इतके युनिट होते. हे युनिट 100 पेक्षा कमी असल्यामुळे प्रति युनिट 3.46 ने मोजले असता बिलाची रक्कम प्रति महिना 233.55 रूपये इतकी होत आ हे .233.55 प्रमाणे 4 महिन्याचे बील केले असता 934.2 रूपये इतकी रक्कम होते. सध्या दिलेल्या बिलाची 2 हजार 180 रूपये इतकी रक्कम आहे. म्हणजे ग्राहकाला तब्बल दीडपट बील जास्त येत आहे. करोनामुळे सर्वजण हतबल झाले आहेत. त्यात महावितरणने दिलेल्या बिलातील रक्कम पाहून लोकांचे डोळे पांढरे झाले आहेत. शासनाने या गंभीर बाबीची दखल घेवून सर्व ग्राहकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post