इचलकरंजी :

इचलकरंजी शहरात शुक्रवार दि.१० जुलै आणि मंगळवार दि.१४ जुलै रोजी सकाळी ७ ते ११ यावेळेत १३ ठिकाणी भाजीपाला विक्री सुरू राहणार
 


PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी:    ( मनू फरास )

 इचलकरंजी शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून नागरिकांची  एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी शहरातील आठवडा बाजार बंद करण्यात आलेले आहेत.
त्याचबरोबर शहरांमध्येसध्या ७ जुलै ते १४ जुलै
पर्यंत १००% लॉक डाउन सुद्धा सुरू आहे.
तथापि या लॉक डाउनमध्ये शुक्रवार १०
जुलै आणि मंगळवार दि.१४ जुलै रोजी सकाळी ६ ते ११ या
कालावधीतअत्यावश्यक वस्तू  खरेदी करण्या साठी शिथीलता
देणेत येणार आहे. या अनुषंगाने शहरातील खालील १३ विविध ठिकाणी भाजीपाला  विक्री सुरू राहणार आहे. 
१) व्यंकोबा मैदान,नाट्यगृह चौक.
२)गांधी कँप चौक, फुले पुतळा रोड.
३)विक्रम नगर, बालाजी चौक रोड.
४)वडगांव बाजारसमिती आतील बाजूस.
५)थोरात चौक   बाजार ठिकाण.
६)योग जिम्नँशियम हॉल  जवळील मैदान.
७)छ.शाहू पुतळा चौक,शाळा मैदान आतील  बाजू
८)यशवंत कॉलनी,  दत्त मंदिर.
९)स्वामी कारखाना रोड.
१०) डेक्कन मिल  मेन रोड.
११)शहापूर कॉ.के.एल. मलाबादे चौक.
१२) सांगली नाका, पाण्याची टाकी.
१३) शहापूर चौक
    
                             सद्यस्थितीत
इचलकरंजी शहरात कोरोना समूह संसर्गाचा धोका होण्याची शक्यता असल्याने शहरातील  नागरिकांना अशी सुचना करणेत येत आहे की   कुटुंबातील फक्त एकाच सदस्यांने आपल्या घरा जवळील भाजीपाला विक्रीच्या ठिकाणी  मास्क लावून आणि वाहनाचा वापर न करता चालत जावून भाजी खरेदी करणेची आहे. भाजी निवडून खरेदी करणेची नाही.
आपल्या आणि भाजी विक्रेत्यांमध्ये सामाजिक अंतर ठेवणेचे आहे.
घरातून निघताना आणि परत घरी गेल्यावर सॅनि टायझरचा वापर करावा. घरी गेल्यावर भाजीपाला
स्वच्छ धुवून घ्यावा. ६० वर्षावरील नागरिकांनी भाजी खरेदीसाठी जावु नये.  याचबरोबर भाजी
विक्रेत्यांनी सुद्धा मास्क आणि ग्लोव्हज चा वापर करणेचा आहे.  नागरिकांना भाजी न निवडता खरेदी  यावी अशी व्यवस्था करावी,  जेणेकरुन भाजी पाला खरेदी करणाऱ्या
नागरिकांकडून  भाजी पाला वारंवार हाताळला जाणार नाही याची दक्षता घेणेची आहे. विक्रेत्यांनी प्रशासनाने
ठरवुन दिलेल्या जागेवर आणि क्षेत्रात विक्री साठी बसणेचे आहे.
तसेच ६० वर्षावरील  विक्रेत्यांना भाजी विक्री करता येणार नाही. त्याचप्रमाणे यापूर्वी भाजीपाला विक्रीसाठी निश्चित करण्यात आलेली  शहरातील विकली मार्केट,लिंबू चौक, किसान चौक, आण्णा रामगोंडा शाळा, साखरपे हॉस्पिटल रोड, शाळा नंबर २ मेन रोड ,फळ  मार्केट रोड शॉपिंग सेंटर, जुने एस. टी. स्टँड चौक या ठिकाणी  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेने प्रतिबंधित क्षेत्रात  (कंटेंनमेंट झोन) घोषित
केलेने सदर ठिकाणची
भाजीपाला विक्री बंद करणेत आलेली आहे.  तरी नागरिकांनी
आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने नियमांचे पालन करुन कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन नगरपरिषद प्रशासना कडून करणेत येत आहे.

       

Post a Comment

Previous Post Next Post