इचलकरंजी :




शितल केटकाळे यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी.
  सर्व आंबेडकर चळवळी पक्ष संघटने कडून  पोलिस महासंचालक यांचे कडे निवेदनाद्वारे मागणी.

PRESS MEDIA LIVE :  इचलकरंजी : मनु फरास 

इचलकरंजीचे माजी उपनगराध्यक्ष रवी साहेब रजपूते हे आंबेडकर चळवळीतील धडाडीचे नेते व सामाजिक चळवळीत तसेच कोरोना चे लढाईत गोरगरीब व गरजू लोकांना लाॅकडाऊन चे काळात सलग दोन महिने संसारोपयोगी साहीत्य धान्य गहू तांदूळ तेल तसेच आरोग्य विषयक सुविधा सॅनिटायझर पीपीई कीट मास्क साबण इत्यादी साहीत्य विशेष करून याचं काळात रक्तदान शिबीर आयोजित करून नागरीकांना व शासनाला सहकार्य करून सामाजिक जबाबदारीच  ओझे घेऊन कार्यरत आहेत.  मागासवर्ग औद्योगिक सह संस्थाचे बाबत शितल आदिनाथ केटकाळे याने रवि साहेब रजपुते यांचेविरूध्द खंडणी चा गुन्हा नोंद केला आहे खरे तर केटकाळे हेच संस्थाचे विरूध्द कटकारस्थान करून मागासवर्ग समाजातील संचालकाना विश्वासात न घेतां शासनाचे कर्ज देणेची जबाबदारी केटकाळे ची असताना ते कर्ज का भरत नाहीत हे विचारणा रवि रजपुते यांनी केटकाळे कडे केली ती संस्था चे मागणी केलेने व त्याच रागाने केटकाळे यांनी रवि रजपुते यांचेविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल केला तरी शितल केटकाळे यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी यासाठी जिल्ह्यातील सर्व आंबेडकर चळवळीतील पक्ष संघटना यांचेकडून मा सुहास वारके विशेष पोलीस महासंचालक यांचेकडे निवेदन देऊन मागणी केली आहे या निवेदनावर .

प्रा शहाजी कांबळे अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र A .
मा उत्तम दादा कांबळे जिल्हाध्यक्ष कोल्हापूर A .
मा प्रा विश्वासराव देशमुख जिल्हाध्यक्ष गवई गट .
मा सुभाष देसाई अध्यक्ष ब्लॅक पँथर जिल्हाध्यक्ष  .
मा बाळासाहेब भोसले जिल्हाध्यक्ष रामविलास पासवा गट मा डी एस डोणे ज्येष्ठ नेते  .
प्रा शरद कांबळे जिल्हाध्यक्ष युवा आघाडी वंचित बहुजन आघाडी  .
कुमार कांबळे आठवले गट अध्यक्ष  .
प्रमोद कदम ज्येष्ठ नेते आंबेडकरी चळवळ .
विनोद कांबळे आदींच्या सह्या आहेत  .

Post a Comment

Previous Post Next Post