कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने सात जि.पी सदस्य पं स सदस्य यांना राजश्री छत्रपती शाहू पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.


कोल्हापूर जिल्हा  परिषदेच्या वतीने सात जि.पी सदस्य पं स सदस्य यांना राजश्री  छत्रपती शाहू पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
तर 14 पत्रकारांना आचार्य अत्रे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


PRESS MEDIA LIVE :.  कोल्हापूर  : ( प्रतिनिधी ) :

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने ७ जि.प सदस्य आणि पं.स सदस्य यांना राजर्षी छ. शाहू पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर १४ पत्रकारांना आचार्य अत्रे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाहू जयंती निमित्त सहकार, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल जि.प. आणि पं.स.सदस्यांना तर पत्रकारितेतील उल्लेखनिय कामगिरीबद्दल पत्रकारांना गौरवचिन्ह, प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी जि.प. अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतिश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, अमन मित्तल, शिक्षण व अर्थ सभापती प्रवीण यादव, बांधकाम व आरोग्य सभापती हंबीरराव पाटील, महिला व बालकल्याण सभापती पद्माराणी पाटील, समाजकल्याण सभापती स्वाती सासणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ आदी उपस्थित होते.

पिंपळगाव मतदारसंघातील जि.प. सदस्य रोहिणी आबीटकर, कोरोची प्रसाद खोबरे, सांगरूळ सुभाष सातपुते, तुडीये विद्या पाटील, शिंगणापूर रसिका पाटील, कसबा सांगाव युवराज पाटील, शिरोळ पं.स.सभापती मिनाज जमादार यांना शाहू पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

तर, विकास कांबळे (पुढारी), चंद्रकांत पाटील (पुण्यनगरी) यांना आचार्य अत्रे पुरस्कार विभागून देण्यात आला. तर तालुकास्तरीय पुरस्कार युवराज पाटील (सकाळ, हातकणंगले) नारायण गडकरी (पुढारी,चंदगड), आनंद कवळेकर (पुढारी, गगनबावडा), राम मगदूम (लोकमत,गडहिंग्लज), सुनिल पाटील (तरूण भारत, आजरा), प्रकाश तिराळे (सकाळ, कागल), एकनाथ नाईक (पुढारी,पन्हाळा), अमर पाटील (सकाळ,शाहूवाडी), संतोष बामणे (पुण्यनगरी,शिरोळ), नंदकुमार गुरव (पुढारी, राधानगरी), सुनिल पाटील (सकाळ,करवीर), अनिल कामीरकर (तरूण भारत, भुदरगड) यांना पुरस्काराने गौरविण्यात आले

Post a Comment

Previous Post Next Post