मुंबई :

करोना महामारीचा प्रचंड फटका चित्रपटसृष्टीला , महानायक अमिताभ बच्चन  यांनी केला मदतीचा हात पुढे.PRESS MEDIA LIVE : 

गणेश राऊळ  : मुंबई.

मुंबई    :   करोना
 महामारीतून निर्माण झालेल्या अस्थिरतेचा फटका चित्रपटसृष्टीलाही प्रचंड प्रमाणात बसला आहे. अशा परिस्थितीत मदतीचे असंख्य हात पुढे सरसावले आहेत.  असाच मदतीचा हात महानायक अमिताभ बच्चन यांनी पुढे केला आहे। ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी चित्रपट क्षेत्रातील कलाकार-तंत्रज्ञ, कामगार यांना मदत करण्यासाठी 'फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज' यांना ‘बिग बाज़ार’चे  १५०० रुपयाचे कूपन्स दिले आहेत, ज्याच्या अंतर्गत जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता येणार आहे.

FWICE या संस्थेचे अध्यक्ष बी. एन. तिवारी यांनी अशे ५०० कूपन्स अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष श्री.विजय खोचीकर यांच्या कडे सुपूर्द केले आणि 
नुकतेच महामंडळाच्या ५०० गरजू सभासदांना या कूपन्सचे वाटप करण्यात आले. 
या मदतीबद्दल 'अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा', अध्यक्ष मा. श्री. मेघराज राजेभोसले यांनी FWICE व ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचे मनापासून आभार मानले आहेत.

Post a comment

0 Comments