बेडकिहाळ , कर्नाटक.

शिंगाडे चारीटेबल ट्रस्टच्या वतीने राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी.

जयंतीचे औचित्य साधून  सीमाभाग पत्रकार संघाचे उद्धघाटन.

  

PRESS MEDIA LIVE :.  बेडकिहाळ :. ( विक्रम शिंगाडे )j

बेडकीहाळ येथे कै.बसवंत नागु शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट चे वतीने राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच जयंतीचे औचित्य साधून सीमाभाग पत्रकार संघाचे उद्दघाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी छ.शाहु महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन फुले वाहुन आदरांजली वाहिली. नंतर सीमाभाग पत्रकार संघाचे उद्दघाटन पी.एस.आय.बिळगी साहेब, सुवाचक चे संपादक राजु बोळके, शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष विक्रम शिंगाडे व सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विक्रम शिंगाडे यांनी पी.एस.आय. बीळगी साहेब यांना शाल, हार, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष राजु बोळके यांचा सत्कार बिळगी साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. 
   कार्यक्रमातील सर्व उपस्थितांना मान्यवरांच्या हस्ते मास्कचे वितरण करण्यात आले. तसेच अध्यक्षीय भाषणामध्ये बोळके म्हनाले की रयतेचे राजे छ.शाहू महाराजांचा जन्म २६ जुन‌ हा दिवस- सामाजिक न्याय दिवस म्हनुन पाळला जातो. पुढे म्हनाले की शिंगाडे हे शिवाजी महाराज, छ.शाहु महाराज, आंबेडकर अशा थोर महामानवांचे जयंती ते विद्यार्थी दशेपासुन प्रेरना घेऊन करत असतात.व सामाजिक, पत्रकार , धार्मिक, शैक्षणिक, अशा विविध क्षेत्रांमध्ये ते ट्रस्टच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य बजावत असतात. 
तसेच शाहु महाराजांचे आदर्श घेऊन आपण पुढे कार्यरत राहीले पाहिजे असे म्हनाले. त्यानंतर पी.एस.आय.बीळगी साहेब, बी.एस.नाडकर्नी, धोंडीराम कुंभार, सुधाकर माने यांनी शाहु महाराज यांच्या महान कार्या बद्दल आपले मनोगत व्यक्त केले. 
     यावेळी जे.के.पम्मार, जीवन यादव, संपत बोरगल, बबन आवळे, नेताजी गोरे, सुभाष पाटील, शंकर कांबळे, कुमार मादीक, गौतम जाधव, प्रशांत कांबळे, बाळु भुई, आदी मान्यवर उपस्थित होते.
  हा कार्यक्रम सोशल डिस्टसिंग व सनिटायझर, मास्क वितरण अशा सर्व नियमांचे पालन करुन करन्यात आले.
  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित कांबळे व आभार सुशिल कांबळे यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post