उपजिल्हा रुग्णालय मंजुरीसाठी कोठेच कमी पडणार नाही -आरोग्यमंत्री नाम. प्रकाश आबिटकर

 दत्तवाड ग्रामीण रुग्णालय इमारतीचा पायाखुदाई संपन्न.


प्रेस मीडिया लाईव्ह :

दत्तवाड:प्रतिनिधी : 

दत्तवाड परिसरातील सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी आधारवड असणाऱ्या दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचा पाया खुदाई समारंभ सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. यावेळी बोलताना नाम. प्रकाश आबिटकर म्हणाले की महाराष्ट्रात शिरोळ पॅटर्न येईल असे सुंदर डिझाईन या ठिकाणी तयार झाले आहे. सुंदर व देखणी वास्तू तयार होईल.उपजिल्हा रुग्णालयासाठी मंजुरी देण्यासाठी कोठेच कमी पडणार नाही.कोरोना काळात सरकारी दवाखान्याचे महत्व कळाले आहे.

        शेताकडे जाणाऱ्या रस्त्याची यापूर्वीची अवस्था अशी होती की गावापर्यंत येणारे रस्त्यांची अवस्था खूप वाईट होती पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब झाले अनाथांचा नाथ एकनाथ आणि ज्या पद्धतीने त्यांनी कामाचा धडाका लावला. बघता बघता गल्ल्या इतकी कामे झाली की आम्हा सगळ्यांना सुद्धा लोकांनी भरभरून मत दिली परंतु त्या मतांच्या नंतर आता दुसऱ्या टप्प्यातलं महत्त्वाचं काम ज्याचा उल्लेख आपण केला तर तो महत्वाचे काम असे आहे की आमच्या सगळ्या मायमाऊली आहेत,आमचे सगळे शेतकरी बांधव आहे. त्यांना गावातनं रोज शेताकडे जातो आणि मग तो चिखलात जात असताना मग तो संध्याकाळच्या वेळेला जात असताना ज्या पद्धतीने अडचण होते त्यामुळे ही रस्ते सुद्धा चांगलं होणं गरजेचं आहे. त्यामुळे या पाणंद रस्त्यांच्या कामाची अतिशय चांगल्या पद्धतीने गतिमानता होण्यासाठी त्याची मंजुरी आपण घेतलेली आहे.ती गतिमान करण्यासाठी तात्काळ कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन आपण बैठक लावून त्याही कामाला गतिमान करण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया तेवढे निश्चितपणे सांगतो सर्व या ग्रामीण रुग्णालयाशी संबंधित असणारे आमचे अधिकाऱ्यांचे सुद्धा अभिनंदन करतो.

     आलमट्टी धरणाच्या उंची वाढविण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयाबद्दल बोलताना नाम.आबिटकर म्हणाले की,आमच्या भागातल्या आमचं पाणी जे असेल ते तिथेच कसं थांबविता येईल यासाठी  महापुराची तीव्रता कमी करण्यासाठीचा जो काही प्रयत्न आहे ते सगळे करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय पण तेवढ्या वरतीच थांबून चालणार नाही एका बाजूला पाण्याचा एकूण महापुरासाठी वरच्या बाजूला जो काही एकूण स्तोत्र आहे तिथं तिथं ते पाणी अडवण्यासाठी आम्ही काम करणार आहोत त्याच्यासाठी साडेतीन-चार हजार कोटीची निधी खर्च होत असताना सुद्धा ज्या पद्धतीने ज्या पाण्याची फुग येते आणि त्याच्यामुळे आमच्या सगळ्या ह्या कोल्हापूर व सांगली या दोन्ही जिल्ह्यातल्या तमाम सगळ्या नागरिकांचे जीवनमान अतिशय अडचणीच होतंय त्या सगळ्यासाठी सुद्धा राज्य शासनाच्या वतीने तेवढ्याच ताकदीने आणि शक्तीने त्याला विरोध करणं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा पद्धतीच्या एखाद्या धरणामुळे लोकांचे जीवनमान कोणत्याही किमतीवरती उध्वस्त होऊन चालणार नाही.यासाठी ज्या काही उपाय योजना करायला पाहिजेत त्या सगळ्यांच्या सगळ्या करण्यासाठी आम्ही सगळे मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करू तेवढे निश्चितपणे आपणा सर्वांना सांगतो.असे उपस्थितांना आश्वत केले.

           

चौकट :१

आरोग्यमंत्र्यांची तत्परता :

आज दत्तवाड येथे ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारती च्या पाया खुदाई प्रसंगी टाकळीवाडी चे माजी सरपंच बाबासाहेब वनकोरे यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर,खासदार धैर्यशील दादा माने उपस्थित असताना २९.०२.२०२० चा टाकळीवाडी प्राथमिक उपकेंद्राच्या मागणीच्या प्रस्तावाची प्रत दिली व सदर उपकेंद्राला मंजुरी दिली अशी घोषणा आरोग्यमंत्री ना.प्रकाश आबिटकर यांनी तात्काळ आपल्या भाषणात केली.लवकरच तांत्रिक बाबी पूर्ण करून उपकेंद्राचे बांधकाम सुरू करावे अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

             यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी ग्रामीण रुग्णालयांसाठी अधिक चा निधी देवून क्वार्टर्स चे बांधकाम पूर्ण करावेत जेणेकरून महापुरासारख्या परिस्थितीत आरोग्य सुविधा मिळतील. दत्तवाड परिसर तसेच सीमाभागातील नागरिकांना अधिक चांगल्या प्रकारची सुविधा मिळण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी केली.

        नव्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीसाठी १६ कोटी१५ लाखांचा प्रशासकीय  निधी मंजूर करण्यात आला आहे. ७२ गुंठ्यावर असणाऱ्या सध्या ३० खाटांचे असणारे रुग्णालय आता ५० खाटांचे होणार असून त्यात स्त्रीरोग व पुरुष वॉर्ड,दोन ऑपरेशन थिएटर, कन्सल्टिंग रुम्स, क्षकिरण,नेत्र,दंत, बालरोग विभाग असणार आहेत.

      सर्व प्रकारच्या सर्जरीसाठी सुविधा, गर्भवती महिलांसाठी विशेष व्यवस्था उपलब्ध होणार आहे.शवविच्छेदन,व एमएलसीसुविधा,महात्मा फुले जनआरोग्य योजना,RBSK योजनांचा लाभ,आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार सुविधा देण्यात येतील महालॅबच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या तपासण्या उपलब्ध होणार आहेत.

      याप्रसंगी प्रांताधिकारी मौसमी चौगुले -बर्डे,तहसिलदार अनिलकुमार हेळकर,जिल्हा आरोग्याधिकारी डॉ.पिळणकर,तालुका आरोग्याधिकारी डॉ.पांडुरंग खटावकर,उपअभियंता सूर्यवंशी,अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ.सरिता थोरात,अधिक्षक डॉ.स्नेहल जाधव,डॉ.दिलीप माने,सावकार मादनाईक,सरपंच चंद्रकांत कांबळे,बबनराव चौगुले,बाबासाहेब वनकोरे,प्रा.चंद्रकांत मोरे,रणजीत पाटील,प्रमोद दादा पाटील,रावसाहेब कोळी,रेखा जाधव,हरिश्चंद्र पाटील यांचे सह शासकीय अधिकारी,कर्मचारी दत्तवाड परिसरातील विविध गावचे सरपंच,ग्रामपंचायत सदस्य,विविध संस्थाचे पदाधिकारी,नागरिक,पत्रकार उपस्थित होते.

     स्वागत व प्रास्ताविक अधिक्षक डॉ. स्नेहल जाधव यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post