प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - कागल तालुक्यातील दौलतवाडी येथील रामदास निवृत्ती जावीर (वय 47) याने एका अल्पवयीन मुलीवर ऑगस्ट 2024 रोजी दुपारी दोनच्या सुमारास गडहिग्लज येथील आरोपीच्या हिंदवी गल्लीतील घरात आरोपीने लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी पिडित मुलीने दि.11 एप्रिल 25 रोजी गडहिग्लज पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी रामदास जावीर यांच्यावर बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, सदरची अल्पवयीन मुलगी ही कर्नाटकातील आडी बेनाडी येथे रहात असून ती सध्या गडहिग्लज येथे कुंभार गल्लीत रहात असून ती रुम शोधत असताना आरोपीने पिडित अल्पवयीन मुलीला रहात असलेल्या चाळीत एक रुम भाड्याने देण्याची आहे.चल तुला दाखवितो असे म्हणुन त्या रुम मध्ये घेऊन जाऊन तिच्या अंगाशी लगट करु लागला .त्या वेळी त्या अल्पवयीन मुलीने त्याला विरोध केला असता माझ्याशी संबंध ठेव नाहीतर तुझ्या मम्मी-पप्पाला ठार मारणार अशी धमकी देऊन जबरदस्तीने त्या अल्पवयीन मुलीशी संबंध ठेवून सदर बाबत घरी कुणाला सांगितल्यास तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन सदरची पिडित मुलगी अल्पवयीन आहे.हे माहित असून सुद्धा तिच्याशी संबंध ठेवल्याने त्यातून ही पिडित अल्पवयीन मुलगी नऊ महिन्याची प्रेंग्नेट राहिल्याने सदर मुलीच्या फिर्यादी वरुन रामदास जावीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान सदर पिडित अल्पवयीन मुलीला तिच्या नातेवाईकांनी शनिवार (दि.03 मे ) रोजी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात केले आले.
याचा पुढ़ील तपास गडहिग्लज पोलिस ठाण्याचे सहा.पोलिस निरीक्षक सागर पाटील हे करीत आहेत.