शरद इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश घेण्यापुर्वीच विद्यार्थ्यांकडून पैशांची मागणी : पालक धास्तावले

 दहावी, बारावीची परिक्षा दिलेल्या पालकांना एकाच वेळी तब्बल 55 हजार घेऊन भेटण्यास बोलवण्यास सुरवात : पैशासाठी शिक्षणाचा मांडला बाजार 

प्रेस मीडिया लाईव्ह :

 यड्राव ( दै. अप्रतिम) : 

                येथील शरद इन्स्टिट्यूट या संस्थेने शिक्षणापेक्षा पैसा कसा महत्त्वाचा आहे याचा नमूनाच दाखवण्यास सुरुवात केली असून दहावी, बारावीची परिक्षा दिलेल्या मुलांचे त्यांच्या शैक्षणिक संस्थेकडून पालकांची परवानगी न घेताच नंबर मिळवून फोनवरून थेट पैशांची मागणी करत शिक्षणापेक्षा पैसा कसा जास्त महत्वाचा असतो याचे प्रदर्शन घडवत या संस्थेने शिक्षणाचा अक्षरशः बाजार मांडला असल्याच्या प्रतिक्रिया यानंतर पालकांमधून उमटल्या असून फक्त पैसे मिळवण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या या अशा संस्थांमध्ये मुलांना प्रवेश द्यायचा कशासाठी? असा सवाल पालक विचारताना दिसत असून या संस्थेत पैसे दिले नसतील तर मुलांना शिक्षण न देता मध्येच शिक्षण थांबवले जात असल्याचे अनेक पालकांचे अनुभव असल्यामुळे शरद इन्स्टिट्यूट मधून येणाऱ्या फोन कॉलनी नागरीक अक्षरशः वैतागले असल्याचे चित्र आहे. 

             सध्या दहावी व बारावीची परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची यादी या संस्थेने विविध शाळांमधून मिळवली आहे. त्या यादीतून विद्यार्थ्यांचे मोबाईल नंबर घेऊन मुलांशी व पालकांशी थेट संपर्क साधला जात आहे. आमच्या शाळेत प्रवेश फक्त पैसे घेऊनच दिले जात आहेत. पैसे घेतल्याशिवाय चौकशीला येऊ नका इथपासून ते 55 हजार रुपये घेऊन या अशा प्रकारचे फोन कॉल येऊ लागल्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांमध्येही खळबळ ऊडाली आहे. यातील कांही कॉल रेकॉर्डिंग पालकांनी सोशल मिडीयावरही पाठवल्याचे समजत असून कॉलमध्ये स्पष्टपणे 55 हजार रूपये फी द्यावी लागेल असे सांगत संबंधित व्यक्तींनी मुलांमध्ये व पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसत असल्यामुळे सध्या शरद इन्स्टिट्यूट सारख्या संस्था फक्त पैसे मिळवण्यासाठी निर्माण केल्या आहेत की काय? अशी विचारणा करण्यात येऊ लागली आहे. 

           पैसा हेच सर्वस्व समजून काम करणाऱ्या शरद इन्स्टिट्यूट सारख्या संस्थांमुळे शिक्षणाचा बाजार मांडला असल्याच्या प्रतिक्रिया सध्या उमटत असून या संस्था विद्यार्थ्यांच्या हितापेक्षा पैशालाच जास्त महत्व देऊन ज्या विद्यार्थ्यांनी फी भरली नाही त्या विद्यार्थ्यांचे मध्येच शिक्षण थांबवले जात असल्याचे तसेच फी वसुलीसाठी वसुली अधिकाऱ्यांचाही वापर करून पालकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याच्या टिकां सध्या पालकांमधून होताना दिसत आहेत. एकंदरीत शरद इन्स्टिट्यूट या संस्थेने पैशासाठी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरू केलेला खेळ आणि चैकशीसाठी येणाऱ्याकडूनही पैसे उकळण्यास सुरवात केल्यामुळे खळबळ उडाली असल्याचे चित्र आहे.

Post a Comment

Previous Post Next Post