.
प्रेस मीडिया लाईव्ह :
सांगली प्रतिनिधी : अशोक मासाळ
श्रीमती विनया देवधर आज 83 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. श्रीमती देवधर , ह्या आपल्या पाठक वृद्धाश्रमात असलेल्या श्रीमती शालिनी परांजपे यांच्या कनिष्ठ भगिनी. दोघीही आश्रमात अत्यंत तृप्त मनाने एकमेकांची काळजी घेत, वास्तव्यास आहेत. श्रीमती देवधर ह्या शाळेतून मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाल्या होत्या.
आपल्या वृद्धाश्रमात रुजू झाले तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचे पती कै. विनायक देवधर होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत त्यांनी वृद्धाश्रमात येऊन वास्तव्य करून उर्वरित आयुष्य आनंदाने भरभरून सर्वांना यथाशक्ती सहाय्य करत जगण्याचा संकल्प केला. शारीरिक दृष्ट्या त्यांना कोणतीही व्याधी नसली तरी अल्प दृष्टी असूनही इच्छाशक्तीच्या जोरावर त्या मात करत असतात. दृष्टीहीन असूनही त्या आजही सर्व कामे स्वतः करत असतात. त्यांचा अत्यंत मनमिळावू स्वभाव, गरजेला सर्वार्थाने सहाय्य करण्याची वृत्ती त्यामुळे त्यांनी मायेने सर्वांना आपलेसे केले आहे.
त्या वृद्धाश्रमाचा उल्लेख मुद्दाम आनंदाश्रम असा करत असतात. त्यामुळे कोणाच्याही मनात सुद्धा येणार नाही की आपण घर सोडून वृद्धाश्रमात आलो आहोत. त्यांच्या सह प्रवेशिका श्रीमती निर्मला गाडगीळ यांनी देवधर आज्जी यांचेसाठी खूप सुंदर काव्य रूपी शुभेच्छा सादर केल्या.
देवधर आज्जी यांची भाची सौ. शोभना फडके यांनी सुद्धा भावार्थपूर्ण श्लोक सादर केला.
देवधर आज्जी यांच्या भगिनी श्रीमती शालिनी परांजपे यांनीही फूल ना फुलाची पाकळी म्हणून संस्थेस अल्पशी आर्थिक मदत केली.
एक कोटी गीता लेखन अंतर्गत श्रीमती शालिनी परांजपे यांचा आणि श्रीमती विनया देवधर यांच्या 83 व्या वर्षातील पदार्पण बद्दल श्री. सुधीर नाईक, व्यवस्थापक, पाठक वृद्धाश्रम तर्फे दोघींचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी सर्व प्रवेशित, कर्मचारी वृंद हजर होते. सर्वांनी भरभरून हा आनंदाचा क्षण बहुगुणीत केला.पाठक वृद्धाश्रमासाठी अशी ही अनमोल रत्ने असल्याचा अभिमान वाटतो, ह्या शब्दात श्री. सुधीर नाईक यांनी गौरविले. ते पुढे म्हणाले माझ्या वृद्धाश्रम मध्ये असलेल्या प्रत्येक सदस्यांची मी काळजी घेईन व प्रत्येकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन त्यांच्यावर जीवापाड प्रेम करीन असे म्हणत श्रीमती विनया देवधर यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.