पाठक वृद्धाश्रम मिरज मध्ये आंतरराष्ट्रीय कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

सांगली प्रतिनिधी : अशोक मासाळ 

पाठक वृद्धाश्रम मिरज मध्ये आंतरराष्ट्रीय कामगार दिन व महाराष्ट्र दिन मराठी राज्यभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी आश्रम मध्ये उपस्थित कामगार भगिनी प्रवेशिकाकडून पुष्पगुच्छ देऊन सर्वांचा सत्कार करण्यात आला कामगार भगिनी देवधार अंजनी, प्रज्ञा पाठक, यांनी कामगार दिनाचे महत्त्व सांगितले तसेच पाठक वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक श्री सुधी नाईक यांनी महाराष्ट्र कामगार दिन राज्यभाषा मराठी या विषयी बोलताना ते म्हणाले एक मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि त्यामुळे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो 

आपला महाराष्ट्र हा शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने निर्माण झाला आहे एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो तसेच एक मे हा दिवस कामगार दिवस म्हणून ओळखला जातो देशाच्या स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी अनेक लोकांनी आंदोलन करून आपल्या प्राणाचे बलिदान दिले एक मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला असे त्याने आपले मत व्यक्त केले व शेवटी आश्रमाचे व्यवस्थापक श्री सुधीर नाईक यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post