स्मार्ट मीटरला जोरदार विरोध - अधिकाऱ्याच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार

 



प्रेस मीडिया लाईव्ह :

अर्जुन धुमाळे :

इचलकरंजी : आज येथील गावभाग परिसरातील अवधूत आखाडा, सारवान बोळ येथील नागरिकांचे घरातील त्या लोकांना पूर्वकल्पना न देता, काही लोक कामाला गेले असताना एम एस ई बी च्या ठेकेदाराच्या कामगारांनी जुने मीटर काढून नवीन मीटर बसवनेच्या कामाला लोकांनी संघटितपणे विरोध केला, एका अधिकाऱ्याने एकेरी उल्लेख केल्यामुळे भागातील नागरिक त्या अधिकाऱ्याच्या अंगावर धावून गेले, मात्र कंपनीच्या कामगारांनी वेळीच सावधगिरी बाळगल्याने पुढील अनर्थ टाळला.

तसेच लालबावटा संघटनेच्या भरमा कांबळे, धनाजी जाधव, नूर बेळकुडे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मीटर लोकांना न विचारता का बदलता, याचा जाब विचारला, व काढलेली सर्व जुनी मीटर ताबडतोब बदलायला भाग पाडले, काही लोकांची मीटर काल बदलली आहेत त्यांचीही मीटर पुन्हा बसवनेचे संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी मान्य केले,

एकूणच लोकांचा प्रचंड विरोध स्मार्ट मीटर बदलणेसाठी दिसून आला,

यावेळी भागातील नागरिक विनायक जाधव, बाळासो कोले, अरुण घाटगे, शंकर कलबूरगे, प्रकाश नलावडे, रामचंद्र सौन्दत्ते, अजित कांबळे, व महिला वर्ग मोठया प्रमाणात उपस्थित होता

Post a Comment

Previous Post Next Post