पुणे मनपाच्या आगामी निवडणुकीसाठी २०११ ची जनगणना गृहीत धरून चार सदस्यीय प्रभाग तयार केले जाणार


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे मनपाच्या आगामी निवडणुकीसाठी २०११ ची जनगणना गृहीत धरून चार सदस्यीय प्रभाग तयार केले जाणार आहेत. त्यामुळे पुण्यात नगरसेवकांची संख्या ही १६६ इतकी राहणार आहे. तर ४२ प्रभाग असणार आहेत.हे सर्व काम उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शेवटचा शासनाचा निर्णय तपासण्यात आला आहे. त्यानुसार प्रभाग रचनेचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेचे अप्पर आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी महेश पाटील यांनी दिली.

मात्र, नव्याने समाविष्ट झालेल्या ३२ गावांमुळे प्रभाग रचना नव्याने होण्याची दाट शक्यता आहे. प्रभागांची संख्या ४२ असणार आहे, तर नगरसेवकांची संख्या १६६ असण्याची शक्यता आहे. मागील सभागृहात १६२ सदस्य होते. केंद्र शासनाकडून २०२१ ची जनगणना जाहीर केलेली नसल्याने या निवडणुका पुन्हा २०११ च्या लोकसंख्येनुसारच होणार असल्याने नगरसेवकांच्या संख्येवर त्याचा मोठा परिणाम होणार आहे.

महापालिकेच्या सभागृहाची मुदत १४ मार्च २०२२ रोजी संपली. त्याच्या सहा महिने आधीच निवडणुकीची प्रक्रिया सुरू होती. याच दरम्यान राज्यात ओबीसी आरक्षणाची सुनावणी, तसेच राज्यातील सत्तानाट्य सुरू होते. महापालिकेची २०१७ ची निवडणूकही चार सदस्यीय प्रभाग रचनेतून झालेली होती. २०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर त्यांनी मुंबई वगळता अन्य महापालिकांमध्ये तीन सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला, तसेच नगरसेवकांची संख्याही वाढविण्याचे निश्‍चित केले होते. त्यानुसार पुणे महापालिकेत ५८ प्रभागांमध्ये १७३ नगरसेवक असतील, हे स्पष्ट झाले.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिकेने नागरिकांच्या हरकती सूचना मागवून, त्यावर सुनावणी घेऊन ही प्रभाग रचना अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र, वारंवार बदलण्यात येणाऱ्या निर्णयावरून न्यायालयात याचिका दाखल झाल्याने निवडणुका रखडल्या, तसेच प्रभाग रचनाही रखडली होती. असे असतानाच पुन्हा राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर फेब्रुवारी २०२४ मध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महापालिकेत चारचा प्रभाग असेल, असा निर्णय घेतला. मार्च महिन्यात हे विधेयक विधिमंडळात मंजूरही केले; पण न्यायलयीन सुनावणी सुरू असल्याने त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही.

Post a Comment

Previous Post Next Post