प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे :राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे अल्पसंख्यांक विभागाचे राज्य उपाध्यक्ष शंतनू कुकडे यावर बलात्कार आरोप, शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर आर्थिक व्यवहार प्रकरणी गुन्हा आणि आता पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्यावर सुनेच्या हत्येचा आरोप .. ते बीड मधील खून गुन्हे, ही सर्वच प्रकरणे गंभीर आहेत.
राजकीय क्षेत्रातील दबदबा असण्याचा, सत्तेचा गैरवापर करीत दमदाटी, खंडणी, मारहाण, गुन्हे, आर्थिक व्यवहार, लैंगिक गुन्हे अशी ही मोठी यादी तयार होते आहे. यामध्ये सर्वच प्रस्थापित पक्षांमधील लोक सामील होताना दिसत आहेत. समाजामध्ये सार्वजनिक जागी असणाऱ्या या दबंगगिरीचा त्रास आता त्या कुटुंबीयांपर्यंत पण पोहोचताना दिसतो आहे. राजकीय दबंगगिरीला जी समाज मान्यता यातून मिळत आहे त्यामुळे हे प्रकार होताना दिसत आहेत.
वैष्णवी हगवणे प्रकरणांमध्ये ज्या पद्धतीची रक्कम हुंड्याच्या स्वरूपात दिली गेली आहे, ती पाहता सामाजिक प्रतिष्ठेसोबत राजकीय प्रतिष्ठा मान मिळवण्यासाठी सुद्धा या लग्न समारंभाचा उपयोग केला जातो आहे हे स्पष्ट होते.
मुलीचे पालक म्हणून असणारी जबाबदारी प्रतिष्ठेपाई टाळणारे आई बाप ही याला अप्रत्यक्ष रित्या जबाबदार आहेत. स्त्रियांच्या हुंडाबळीचा प्रश्न या एकविसाव्या शतकातही आपल्याला भेडसावतो आहे ही बाब आपली मान खाली घालणारे आहे. प्रस्थापित पक्षातील या मोठ्या नेत्यांनी स्वतःलाही आचारसंहितेची बंधने घालण्याची गरज आता दिसते आहे. गेल्या काही दिवसातील या सर्वच प्रकरणाबाबत अजित पवार यांचे मौन निषेधार्ह आहे.
- मुकुंद किर्दत, प्रवक्ता,आम आदमी पार्टी महाराष्ट्र
...........